जावलीत एका दिवसात 18 जणांचा मृत्यू, मुंबईपेक्षाही साताऱयात चिंताजनक बाधित वाढ
प्रतिनिधी/ सातारा
सध्या मुंबई, ठाणे, पुण्यातील बाधित वाढीचा वेग कमी आलेला आहे. मात्र, सातारा जिल्हय़ात दैनंदिन 2 हजारांच्या पुढे होणारी कोरोना बाधित वाढत थांबत नाही. मुंबई, ठाणे या मोठय़ा शहरांशी तालुका केली तर सातारा जिल्हय़ाची कोरोना बाधित वाढ चिंताजनक आहे. मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 25 लाख एवढी असताना 8 मे रोजी तिथे 2,110 एवढे बाधित समोर आलेत तर सातारा जिल्हय़ाची लोकसंख्या 30 लाख असताना 8 मे रोजी जिल्हय़ात 2,394 एवढय़ा संख्येने बाधित समोर आलेत. ही तुलना पाहता सातारा जिल्हय़ातील स्थिती सावरण्यासाठी सजग व्हायला. त्यातच शनिवारच्या अहवालात पुन्हा बळींच्या संख्येने नवीन उच्चांक केल्याने जिल्हा हादरला असून 59 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 18 एकटय़ा जावली तालुक्यातील आहेत.
दरम्यान, शनिवारी रात्री आलेल्या अहवालात 2,334 जणांचा अहवाल बाधित आला आहे. गेल्या 24 तासात 59 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर रविवारी सायंकाळी 1,516 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिलीय.
9 तालुक्यात जोर, 2 तालुक्यात मंदावतोय
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. सातारा 424 (27,816), कराड 379 (18,190), फलटण 288 (16,320), खंडाळा 171 (7,590), खटाव 281 (10, 717), माण 231 (7,972), कोरेगाव 149 (10,335), जावली 148 (5,908), वाई 140 (9,179), पाटण 91 (5,061), महाबळेश्वर 17 (3,528), व इतर 15 (685) असे आज अखेर एकूण 1,23,301 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
जावली 18, सातारा 13 बळीने वाढली चिंता
5 मे रोजी 58 बाधितांचा मृत्यू झाल्याचा उच्चांकी आकडा आला ह ाsता त्यानंतर चार दिवसांनी शनिवारी रात्री आलेल्या अहवालात पुन्हा 59 एवढय़ा उच्चांकी बाधितांच्या संख्येने जिल्हा हादरुन गेला आहे. यामध्ये एकटय़ा जावली तालुक्यात 18 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्या पाठोपाठ सातारा 12, कराड 8 अशी चिंताजनक आकडेवारी आली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. सातारा 13 (839), कराड 8 (503), जावली 18 (126), खटाव 5 (294), खंडाळा 1 (97), कोरेगांव 3 (260), माण 3 (162), महाबळेश्वर 0 (36), पाटण 1 (129), फलटण 2 (208), वाई 5 (233) , व इतर 0, असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 2,887 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
लोक नियम पाळतात तरी वाढ कशी ?
अनलॉक नंतर जिह्यातील नागरिकांमध्ये बेशिस्तपणा वाढला होता. ग्रामपंचायत निवडणुका, लग्नग्न, आंदोलने आणि इतर ठिकाणी गर्दी केली जात होती. मास्कचा वापरही कमी झाला होता मात्र त्या काळात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बाधित वाढ होत नव्हती आता लॉकडाऊन सुरू असून लोक नियम पाळून घरात बसलेले आहेत. तरी देखील बाधित वाढ आणि तीही मोठय़ा संख्येने ही अनाकलनीय आहे. जिह्यात हजारोंच्या संख्येने सुरू असलेली बाधित वाढ चिंता वाढवत असतानाच वाढीतील उच्चांक, कोरोना बळीच्या आकडय़ांमध्ये उच्चांक परिस्थितीचे गांभीर्य वाढवू लागले आहेत. त्यामुळे जिह्याला सावरण्यासाठी उपाय योजना वाढवून संसर्ग रोखण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा हे निश्चितच.
रविवारी 2,172 जणांचे लसीकरण
गेल्या चार पाच दिवसांपासून लसीकरणाला लागलेला ब्रेक लशींचा पुरवठा झाल्याने निघाला आहे. रविवारी 2 हजार 172 जणांना लस देण्यात आली असून गेल्या दोन तीन दिवस हा आकडा फक्त हजारावर रेंगाळत होता. सातारा जिल्हय़ातही उपलब्ध साठय़ावर 18 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरु झालेय. यामुळे पहिला डोस घेण्याची एकूण संख्या 5 लाख 45 हजार 273 झाली आहे. तर आतापर्यंत 87 हजार 916 जणांनी लस घेतल्याने एकूण जिल्हय़ात एकूण लस घेणाऱयांची संख्या 6 लाख 33 हजार 189 एवढी झाली असल्याचे डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
आजपासून 18-44 वयोगटातील लसीकरण सत्र
दि. 10 मे पासून सातारा जिह्यात खालील ठिकाणी 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यासाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन अपॉईंटमेन्ट घेणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी www.cowin.gov.in आणि https://selfregistration.cowin.gov.in या संकेतस्थळावर अपॉइनमेन्ट निश्चित करता येईल. जिह्यातील कराड उपजिल्हा रुग्णालय, कोरेगाव ग्रामीण रुग्णालय, खटाव प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण ग्रामीण रुग्णालय, फलटण उपजिल्हा रुग्णालय, महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय, माण येथील ग्रामीण रुग्णालय, दहिवडी. मेढा ग्रामीण रुग्णालय, वाई ग्रामीण रुग्णालय, खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरवळ. व सातारा जिल्हा रुग्णालय येथे लसीकरण होणार आहे.
रविवारी 2,172 जणांचे लसीकरण
गेल्या चार पाच दिवसांपासून लसीकरणाला लागलेला ब्रेक लशींचा पुरवठा झाल्याने निघाला आहे. रविवारी 2 हजार 172 जणांना लस देण्यात आली असून गेल्या दोन तीन दिवस हा आकडा फक्त हजारावर रेंगाळत होता. सातारा जिल्हय़ातही उपलब्ध साठय़ावर 18 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरु झालेय. यामुळे पहिला डोस घेण्याची एकूण संख्या 5 लाख 45 हजार 273 झाली आहे. तर आतापर्यंत 87 हजार 916 जणांनी लस घेतल्याने एकूण जिल्हय़ात एकूण लस घेणाऱयांची संख्या 6 लाख 33 हजार 189 एवढी झाली असल्याचे डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
जिल्हय़ात 1,335 बेड रिक्त
जिल्हय़ात कोव्हिड हॉस्पिटल्स वाढवण्यात आली असून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडही वाढवण्यात आले आहेत. आजमितीस जिल्हय़ात 5 हजार 673 बेड उपलब्ध असून त्यापैकी कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 4,377 तर कोरोना केअर सेंटर 1,296 असे मिळून ही संख्या आहे. यामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,447 एवढी असून जिल्हय़ात 1,335 बेड रिक्त असले तरी रुग्णांना ते मिळण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये कोरोना केअर सेंटर्स मध्ये 395 तर कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये आयसीयू व्हेंटीलेटरसह 15 बेड, आयसीयू व्हेंटिलेटरविना 55, ऑक्सिजनसह 563 बेड आणि ऑक्सिजनविना 297 बेड रिक्त आहेत.