प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यातला धोका दिवसेंदिवस वाढत आहे. हा आठवडा तर प्रचंड वेगाने कोरोनाबाधित असल्याचा आकडा मोठा असल्याचे दाखवत आहे. सोमवारी पुन्हा त्यात ५८ ची भर पडली असल्याने जिल्हा हादरला आहे. आजमितीस एकूण बाधितांचा आकडा १ हजार ३१ इतका वाढला आहे. सातारा जिल्हा महाराष्ट्रातील पहिल्या १० जिल्ह्यात गेला असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान आज जिल्ह्यातील सातजणांचा दहाव्या दिवशीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून ते कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान कराड व जावली तालुका हॉटस्पॉट ठरू लागला असून जावली तालुक्यातील रामवाडी या एकाच गावात एकाच दिवशी १० रुग्ण वाढले आहेत. तर कराड तालुक्यात एकाच दिवसात १७ रूग्ण वाढल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात ५८ नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
जावली तालुक्यातील रामवाडी येथील २७ व ४८, ३० वर्षीय महिला, ५ वर्षाचा बालक, आखेगनी येथील ६८ वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला, बिरामनेवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष. ४८ वर्षीय पुरुष व २२ वर्षीय युवक, वय ४२, ४८, ४३ व ५५ वर्षीय महिला, बामणोली तर्फे कुडाळ येथील ४६ वर्षीय पुरुष, आखेगणी येथील १६ वर्षीय युवक
कराड तालुका पुन्हा हॉटस्पॉट
कराड १६ तालुक्यातील गोळेश्वर येथील ४६ वर्षीय पुरुष, चचेगाव येथील ४०, २०, ४५, ६५ वर्षीय महिला १२ मुलगी, २० वर्षीय युवक, ८ वर्षाचा मुलगा, उब्रंज येथील ४७ वर्षीय पुरुष व ४५ वर्षीय महिला, ४३ वर्षीय पुरुष, मसूर येथील १० वर्षाचा मुलगा, ५० वर्षीय महिला, ५६, २७, २३ वर्षीय पुरुष पाटण १ तालुक्यातील सांघवड येथील ३१ वर्षीय पुरुष. फलटण ८ तालुक्यातील जिंती येथील ४ वर्षीय महिला, रविवार पेठ येथील २६, २७ वर्षीय महिला, 9, 6, 4 वर्षाची मुलगी, 7 वर्षाचा मुलगा, अलगुडेवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष. वाई तालुक्यातील वाघजाईवाडी येथील 44 वर्षीय महिला, पसरणी येथील 47 वर्षीय महिला, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष, धरमपुरी येथील 35 वर्षीय पुरुष व ब्राम्हणशाई येथील 68 वर्षीय महिला. सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 53 वर्षीय पुरुष, दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन कॉर्टर 39 वर्षीय पुरुष, जिहे येथील 68 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय 2 पुरुष, क्षेत्र माहूली येथील 50 वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी येथील 32 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष. शिरवळ येथील 83 वर्षीय वृध्द, व 31 वर्षीय महिला. माण तालुक्यातील खडकी (पाटोळे) येथील 54 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
कराड शनिवार पेठेतील बाधिताचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे शनिवार पेठ, कराड येथील 75 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
7 नागरिकांना आज दिला डिस्चार्ज
विविध रुग्णालय व कोरोना केंअर सेंटरमध्ये उपचार घेऊन कोरोनातून बऱ्या झालेल्या 7 नागरिकांना आज 10 दिवसानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये मुंबई चेबूर येथील 51 वर्षीय महिला जावली तालुक्यातील गांजे यैथील 45 वर्षीय महिला कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, 38 व 21 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक. पाटण तालुक्यातील धामणी येथील 21 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
535 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 15, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 84, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 126, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 21, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 12, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 56, शिरवळ येथील 58, रायगाव येथील 25, पानमळेवाडी येथील 12, मायणी येथील 6, महाबळेश्वर येथील 20, पाटण येथील 67, दहिवडी येथील 33 असे एकूण 535 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
मृत पुरुषाचा नमुना पाठविला तपासणीला
आज दुपारी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेल्या जैतापूर रोड देगाव सातारा येथील 37 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कोविड संशयित म्हणून उपचार करते वेळेस त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
संशयित महिलेचा मृत्यू
काल रात्री मलकापूर ता. कराड येथून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सारी आजारामुळे दाखल झालेल्या 85 वर्षीय महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कोविड संशियत म्हणून या महिलेचा नमुना उपचारादरम्यान घेतला असून तो पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
सोमवार पर्यंत जिल्ह्यात
एकूण बाधित 1031
एकूण मुक्त 720
बळी 43
सोमवारी
एकूण बाधित 58
एकूण मुक्त 07
बळी 01
.