अचूक बातमी “तरुण भारत”ची,
मंगळवार 10 ऑगस्ट 2021, सकाळी 10.00
● तपासण्या 11,241 ● काल दिवसभरात 827 जण बाधित ● 198 केंद्रावर 16 हजार 733 जणांचे टुचुक ● मृत्यू होण्याचे प्रमाण आले कमी
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या कालच्या 24 तासांच्या अहवालामध्ये 827 जण कोरोना बाधित आढळून आले. दररोज 11 हजारच्या दरम्यान कोरोना तपासण्या केल्या जात आहेत. मात्र, सोमवारी दिवसभरात आढळून आलेला पॉझिटिव्हिटी रेट हा परवापेक्षा 1.76 ने जास्त म्हणजेच 7.35 टक्के एवढा आहे. बाधित होण्याचे प्रमाण कमी जास्त होत आहे.
लसीकरणाची नोंद 16,733
जिल्ह्यात काल दिवसभरात 198 केंद्रावर 16,733 जणांनी लस घेतली. त्यात शासकीय लसीकरण केंद्र 176 तर खाजगी 22 केंद्राचा समावेश आहे. काल रात्रीपर्यंत जिल्ह्यातील 13 लाख 88 हजार 837 जणांनी लसीचा डोस घेतला. त्यात पहिला डोस घेणारे 9 लाख 77 हजार 88 जण तर दुसरा डोस घेणारे 4 लाख 11 हजार 749 जण आहेत.
पॉझिटिव्हीटी रेट दहा दिवसांत एकदाच 5 वर
सातारा जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही राज्यातील सगळ्यांच्या नजरा लावून ठेवत आहे. गेल्या दहा दिवसांत आढळून येणाऱ्या बाधितांचा संख्येमुळे फक्त एकदाच दि. 3 रोजी 5 एवढा पॉझिटिव्हीटी रेट होता. इतर दिवशी तो सात ते आठ च्या दरम्यान राहिला गेला आहे.
दहा दिवसातील पॉझिटिव्हीटी रेट दि.31…….5.8 , दि.1………7.23, दि.2…….. 8.7 , दि. 3……..5.00, दि. 4……..9.27, दि. 5……..5.75, दि. 6…..….7.44, दि. 7………6.05, दि.8……….5.69, दि. 9………7.35
त्यामुळे पॉझिटीव्हीटी रेट हा कमी जास्त होत असला तरीही जिल्हावासीयांच्यासाठी चिंतेची बाब आहे. कारण पॉझिटिव्हीटी रेटवर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जातो.
मंगळवारपर्यत एकूण नमूने………15,03,197, एकूण बाधित…….2,25,279, कोरोनामुक्त……… 2,12,420 मृत्यू………………..5464, उपचारार्थ रुग्ण……9742