अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 12 फेब्रुवारी 2022, सकाळी 10.30
● जिल्ह्यात नव्याने 149 जण बाधित
● चार तालुके दहाच्या खाली
● सर्वात कमी महाबळेश्वर तालुक्यात बाधित
● शुक्रवारी दिवसभरात 2748 जणांचे स्वॅब तपासणी
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात नव्याने 2748 जणांचे स्वॅब तपासण्यात आले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची नव्याने होणारी वाढ आता दिडशेच्या खाली आलेली आहे. शुक्रवारी दिवसभरात नव्याने 149 जण बाधित आढळून आल्याने आतापर्यत जिल्ह्यात 2 लाख 78 हजार 965 बाधित संख्या झालेली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा 5.42 वर आलेला आहे.
जिल्ह्यात नव्याने बाधित 149 जण
जिल्ह्यात बाधित वाढ आता कमी होवू लागली आहे. सर्वच तालुके सावरत आहेत. सर्वच तालुक्यांमध्ये नव्याने होणारी बाधित वाढ ही 26 च्या खाली आहे. शुक्रवारी दिवसभरात 2748 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत स्वॅब तपासणी करणाऱ्यांची संख्या 25 लाख 28 हजार 843 वर गेली आहे. तर नव्याने बाधित जिह्यात 149 जण आढळून आल्याने बाधितांची संख्या 2 लाख 78 हजार 965 झाली आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यात 26, कराड तालुक्यात 25, माण तालुक्यात 23, फलटण तालुक्यात 15, कोरेगाव तालुक्यात 13, वाई तालुक्यात 13, खंडाळा तालुक्यात 12, खटाव तालुक्यात 9, पाटण तालुक्यात 5, महाबळेश्वर तालुक्यात 3, जावली तालुक्यात 2, सातारा जिल्ह्यात 146 व इतर जिल्ह्यातील 3 असे 149 जण नव्याने बाधित आढळून आले असून जावली, तालुक्यात सर्वात कमी बाधित आढळून आले आहेत.
कोरोनामुक्तीचा वेग चांगला
जिल्ह्यात बाधित वाढीचे प्रमाण घटत चालले असल्याची चांगली दिलासादायक बाब आहे. त्याच अनुषंगाने कोरोनामुळे बरे होणाऱयांची संख्या दुप्पट आहे. सक्रीय रुग्ण हजारच्या आसपास जिल्ह्यात असून त्यापैकी दीडशे जण हे हॉस्पिटलायझेशनमध्ये उपचार घेत आहेत. बाकीचे घरच्या घरीच उपचार घेत असल्याने दिलासादायक बाब आहे.
शनिवारी
नमूने-2748
बाधित-149
शनिवारपर्यंत
नमुने-25,28,843
बाधित-2,78,965
मृत्यू-6652
मुक्त-2,69,778