अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 28 जानेवारी 2022, दुपारी 12.00
● चोवीस तासांत 790 बाधित
● बाधित सरासरी 22.57 टक्के
● 3499 जणांच्या चाचण्या
● सातारा-कराडमध्ये जास्त रुग्ण
सातारा / प्रतिनिधी :
गुरुवारी रात्रीच्या आकडेवारीनुसार सलग दुसऱ्या दिवशी बाधित रुग्ण संख्या पुन्हा एक हजाराच्या खाली राहिली आहे. गेल्या चोवीस तासांत 790 जण बाधित आले आहेत. चाचण्यांची स़ंख्या वाढूनही वाढीचा वेग दोन दिवस कमी राहिला आहे.
बाधित सरासरी घसरली
जिल्ह्यात बुधवारच्या अहवालात 26 इतके बाधित सरासरीचे प्रमाण होते. यात गुरुवारच्या अहवालात घट झाली आहे. 22.57 टक्के इतके प्रमाण आहे. यासाठी 3499 इतके नमुने तपासले आहेत.
सातारा-कराडात सर्वाधिक वाढ
जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही सातारा आणि कराड तालुक्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे. दोन्ही ठिकाणी आरोग्य सुविधा व तपासण्या जास्त प्रमाणात होत असल्याने येथे रूग्ण आढळल्याचे प्रमाण जास्त आहे.
शुक्रवारी
नमुने-3499
बाधित-790
शुक्रवारपर्यंत
नमुने-2479679
बाधित-272679
मृत्यू-3539
मुक्त-252433