उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा,
खेड प्रतिनिधी
ज्याठिकाणी भाजपा मजबूत आहे त्याठिकाणी महाविकास आघाडीतील उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करून भाजपाची धन करू न देता सामंजस्यपणाची भूमिका घेवून एकत्रितपणे लढले पाहिजे, असा कानमंत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. रत्नागिरी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 750 कोटी रूपये देणार असल्याची घोषणाही केली.
खेड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी शहरातील वैश्यवाणी भवनात जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी सोमवारी संवाद साधला. यापसंगी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.