सातारा : जिल्ह्यातील 20 शासकीय रुग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजन निर्मितीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लवकर या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होणार असून, कोविडच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने ही पूर्वतयारी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
सिंह म्हणाले, कुपर कार्पोरेशन प्रा.लि यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी केलेल्या करारानुसार नाममात्र भाडे तत्वावर सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये जनरेटर सेट बसविण्याचे काम पूर्ण केले आहे. आणखी 5 जनरेटर सेट बसविणार आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारे संचही कुपर कार्पोरेशनने बसविले आहेत.