कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शनिवारी सायंकाळ पर्यंत ५२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सकाळी ३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यात दुपार पर्यंत आणखी २९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यांनतर आणखी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात सायंकाळपर्यंत ५२ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ५५६ वर पोहचली आहे. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे.