कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्हय़ात शुक्रवारी सायंकाळपर्यत 1170 स्वॅबचे रिपोर्ट आरटीपीसीआर लॅबकडून मिळाले. यामध्ये 47 पॉझिटिव्ह रूग्ण समोर आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 483 वर पोहोचली. दरम्यान, चंदगड तालुक्यात एकाच दिवशी सर्वाधिक 17 रूग्ण मिळून आल्याने शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
जिल्हय़ात गुरूवारी रात्रीपर्यत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 436 होती. शुक्रवारी दुपारपर्यत 30 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सायंकाळी नव्याने 17 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 483 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये 18 महिला आणि 28 पुरूषांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सांयकाळी दिली.