प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव पूर्णतः कमी होतानाचे दिलासादायक चित्र आहे. रविवारी जिल्ह्यात केवळ पाच रुग्ण आढळून आले. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सक्रीय रुग्णसंख्या 152 इतकी आहे.
आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार रविवारी करवीर तालुका, जयसिंगपूर नगरपालिका आणि कोल्हापूर शहरात प्रत्येकी एक रुग्ण तर सांगली जिल्हयातील 2 रुग्ण आढळले. आरटीपीसीआरच्या 201 अहवालामधून एकही रुग्ण बाधित आढळला नाही. अँटिजेन टेस्टच्या 207 अहवालामधुन 1 आणि खासगी हॉस्पिटल आणि लॅबमधून प्राप्त झालेल्या 220 अहवालामधुन 4 रुग्ण बाधित आढळले.