75 लाभार्थींना पातनिधीक स्वरूपात लसिकरण
प्रतिनिधी/रत्नागिरी
जिल्हयामध्ये आरोग्य विभागामार्पत राबवण्यात आलेल्या डमी कोविड 19 लसीकरण ‘ड्राय रन’ मोहीम 75 लाभार्थींची लाभार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपात तालिम घेण्यात आली. लसिकरण कक्षामध्ये संबंधीत लाभाथ्यांची पुन्हा पडताळणी करुन लसिकरण केल्यानंतर देखरेख कक्षामध्ये त्यांना अर्धा तास निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते.
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील सुचनेनुसार जिल्हाधिकारी, व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हयामध्ये तीन ठिकाणी कोविड-19 लसीकरण ड्रायरन’ मोहिम राबविण्यात आली. यामुळे कोविड 19 च्या येऊ घातलेल्या लसीकरण मोहिमेसाठी सुयोग्य अंमलबजावणीसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज झाला आहे. रत्नागिरी जिल्हयामध्ये सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी, उपजिल्हा रुग्णालय दापोली व प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा अशा एकुण तीन ठिकाणी कोविड 19 लसीकरण ड्राय रन मोहिम राबविण्यात आली.