अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार16 मार्च 2022, सकाळी 11.45
● होळीसाठी शासनाकडून निर्बंध
● 703 चाचण्या
● 0.57 टक्के बाधित वाढीचा दर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत चार रुग्ण आढळले असून, यासाठी 703 चाचण्या झाल्या आहेत. होळी, रंगपंचमी आल्याने शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत.
चार तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण
गेल्या चोवीस तासांत माण, खटाव, पाटण, वाई या चार तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे. सातारा, कराडसह अन्य सात तालुके निऱक आहेत.
होळीसाठी शासनाकडून निर्बंध
कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी देखील होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली घोषित केली आहे. हे नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहेत. रात्री दहाच्या आत होळी करावी तसेच डीजे लावण्यास बंदी घातली आहे. डीजे लावल्यास कायदेशीर बंदी घातली आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास देखील कारवाई केली जाणार आहे. राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये, अशी देखील सूचना देण्यात आली आहे. जोरात लाऊड स्पीकर लावल्यास कारवाई केली जाणार आहे.
बुधवारी
नमुने-703
बाधित-04
बुधवारपर्यंत
नमुने-25,64,612
बाधित-2,79,154
मृत्यू-6,681
मुक्त-2,71,725