कोरोना 3 बळी, कोरोनामुक्त संख्या 44 हजारांवर
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 74 नवे रूग्ण दिसून आले तर 71 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची एकूण संख्या 44 हजार 53 झाली आहे. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 47 हजार 643 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 973 रूग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. अनील गवळी यांनी दिली.
जिल्ह्यात गुरूवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 433 जणांची तपासणी झाली. त्यातील 168 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे. सध्या 1 हजार 973 रूग्ण उपचार घेत आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमधून 422 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 381 निगेटिव्ह तर 41 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 168 रिपोर्ट आले. जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये शाहूवाडी येथील 82 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला तर खासगी हॉस्पिटलमध्ये इस्लामपूर सांगली येथील 72 वर्षीय महिला आणि नांदणी शिरोळ येथील 63 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या 1 हजार 617 झाली आहे. कोरोनाने आजपर्यत ग्रामीण भागात 786, नगरपालिका क्षेत्रात 337 महापालिका क्षेत्रात 357 तर अन्य 137 जणांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासांत 71 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 44 हजार 53 झाली आहे. भुदरगड 1, चंदगड 3, गडहिंग्लज 1, गगनबावडा 1, हातकणंगले 8, करवीर 4, पन्हाळा 2, राधानगरी 1, शिरोळ 5, नगरपालिका क्षेत्रात 5, कोल्हापूर शहर 40 आणि अन्य 3 असे 74 रूग्ण असल्याची माहिती डॉ. अनील माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 74 कोरोनामुक्त 71, कोरोना 3 मृत्यू
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण : 47 हजार 643
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण : 44 हजार 053
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण : 1 हजार 973
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी : 1617