अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 7 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.00
● फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सात दिवसात जिल्ह्याला दिलासा
● सोमवारी दिवसभरात 1392 जणांचे स्वॅब तपासणी
● जिल्ह्याची पॉझिटिव्हीटी 10.13
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील बाधित वाढ ही फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेपासून कमी होऊ लागल्याने सात दिवसात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने कोरोनामुक्तीचा निर्धार केलेला आहे. त्याच वाटेवर जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. सोमवारी दिवसभरात 1392 जणांचे स्वॅब घेतले असून नव्याने बाधित वाढ घटत आहे. मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालानुसार 141 जण बाधित आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 10.13 वर आलेला आहे.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी 10.13 वर
सातारा जिल्ह्यातील बाधित वाढ घटू लागली आहे. नव्याने होणारी बाधित वाढ ही दररोज घटत आहे. ही घट जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. नव्याने होणारी बाधित वाढ सुमारे 60 च्या दरम्यान घट होत आहे. त्यामध्ये आरोग्य यंत्रणा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नव्याने बाधित 141 जण आढळून आले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 10.13 वर आलेला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात सगळ्यात कमी बाधित
सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात सगळ्यात कमी बाधित वाढ महाबळेश्वर तालुक्यात राहिली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर शहरात सुरुवातीपासून नियमांची अंमलबजावणी करण्यात आली तसेच महाबळेश्वर तालुक्यातील सर्वच गावात कोरोनाला हद्दपार करण्याचा विडा घेतला गेला होता. त्यामुळे बाधित वाढ ही सुरुवातीपासून ते आतापर्यंत अल्प प्रमाणात राहिली आहे. शासन जे जे निर्णय घेईल त्याची पुरेपूर अंमलबजावणी महाबळेश्वर तालुक्यातील होत असते. तर सातारा तालुका बाधित वाढीत सगळ्यात पुढे राहिला आहे. जिल्ह्यातून आणि बाहेरून ही उपचार करण्यासाठी रुग्ण सातारा येथे येतात असे कारण सांगितले जात आहे.
मंगळवारी
नमुने-1392
बाधित-141
मंगळवारपर्यंत
नमुने-25,18,169
बाधित-2,78,339
मृत्यू-6,629
मुक्त-2,66,679