अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 12 डिसेंबर 2021, स. 10.45
● 1944 जणांचे स्वॅब तपासणी
● नव्याने 9 जण बाधित
● आरोग्य यंत्रणेच्या मेहनतीचे होतेय चीज
● लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न
● मृत्यूदर रोखला, मुक्तीचा वेग कायम
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात सुमारे 35 लाख लोकसंख्या असूनही यापैकी 18 वर्षाच्या पुढील सर्वच नागरिकांना सुरक्षितेच्या कारणास्तव लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्यात 100 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न सुरू असून येत्या काही दिवसात ते पूर्ण होऊन संपूर्ण जिल्हा लसवंत होईल. मग कोरोनाला कोसो दूर ठेवण्यात जिल्हा पुढे असेल. आरोग्य यंत्रणा जिल्ह्यातील नव्याने आढळून येणारी बाधित वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करत असून त्याकरिता घेत असलेल्या मेहनतीला यश येत आहे. काही दिवसात शून्य गाठुन जिल्हा कोरोना मुक्त करण्याकरिता आरोग्य विभाग काम करतोय.
नव्याने 9 जण बाधित
दररोज होणाऱ्या स्वॅब तपासणी आणि त्यामध्ये नव्याने आढळून येणारे बाधित ही संख्या आता शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी दिवसभरात झालेल्या तपासण्यांच्या आकडा हा 1944 होता. तर बाधित संख्या ही 9 वर आलेली आहे. त्यामध्ये सहाहुन अधिक तालुक्यात शून्य बाधित आहेत. कोरोनाला ब्रेक लावण्यात यश आले आहे.
मृत्यू दर पूर्णपणे रोखला
जिल्ह्यातील कोरोना झालेले ठणठणीत बरे होत आहेत. बरे होणाऱ्यांची संख्या आतापर्यंत 2 लाख 44 हजार 646 एवढी आहे तर आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 6483 असून कोरोना मृत्यूला पूर्णपणे ब्रेक लावण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.
रविवारी
नमुने-1944
बाधित-9
रविवारपर्यंत
नमुने-23,31,255
बाधित-2,52,083
मृत्यू-6483
मुक्त-2,44,646