कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्ह्यात शनिवारी रात्री अकरा वाजेपर्यंत दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरातील सायबर चौक, काटकर पार्क येथील 57 वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, निगवे खालसा येथील 52 वर्षे पुरुष, हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथील 48 वर्षीय महिला, शाहूवाडी तालुक्यातील कासार्डे येथील 30 वर्षीय पुरुष, तसेच तीन आणि चार वर्षाच्या बालकांचा समावेश आहे.
याशिवाय राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे आणि दिगज येथील 49 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरातील आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याचे वय अंदाजे 45 वर्ष आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 720 वर पोहोचली आहे.