अचूक बातमी “तरुण भारत” ची, मंगळवार, 20 जुलै 2021, सकाळी 11.15
● वाढीचा रतीब थांबणार तरी कधी ● सोमवारी अहवालात 862 बाधित ● 11,569जणांची तपासणी ● जिल्ह्यात 3,009 बेड रिक्त● 2,050 ऑक्सिजन बेड रिक्त ● पावसाळ्याच्या तोंडावर चिंता ● सातारा, कराड अद्याप सावरले नाही
सातारा / प्रतिनिधी :
देशाचं राहूदे राज्यभरात इतर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग आटोक्यात येऊ लागला आहे. साताऱ्यात मात्र 800 च्या पटीत सुरु असलेली बाधित वाढ थांबण्याचे चिन्ह नाही. फक्त रविवारचा अहवालात बाधित वाढ थोडी कमी झाल्याचा दिलासा घेवून लढा सुरु ठेवताना पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणून गेल्या दिवसांपासून सुरु असलेले कोरोना संसर्गाचे हे सत्र थांबणार तरी कधी ? असा सवाल जिल्हावासियांना पडला असतानाच सोमवारी रात्रीच्या अहवाल देखील 862 जणांचा अहवाल बाधित आल्याने पुन्हा जिल्ह्यात हे नेमके चाललंय काय? असाच सवाल पुन्हा मनात उभा रहात आहे. प्रशासनाने नेमकी याबाबतची भूमिका मांडायला हवी हे निश्चितच.
पॉझिटिव्हिटी दर अहवालात नाही
मंगळवारी सकाळी देण्यात आलेल्या सोमवारी रात्रीच्या अहवालात आठ सहा दोन जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये 11 569 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे मात्र, या अहवालात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर किती व rt-pcr टेस्ट यांचा पॉझिटिव्हिटी दर किती याची माहिती देण्यात आलेली नाही. फक्त किती तपासण्या झाल्या व किती बाधित आले एवढाच उल्लेख आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर चिंतेचे सावट
कोरोना थंडीत थांबत नाही, कडक उन्हात ही थांबत नाही, आता पावसाळा तोंडावर आला तरी थांबेनासा झालाय. सातारा कराड तालुक्यावर त्याची मोठी वक्रदृष्टी आहे. या दोन्ही तालुक्यामुळे जिल्हा आजच्या चक्रात पुन्हा घुसळून निघत आहे. मात्र, या दोन्ही तालुक्यातील बाधित वाढीचा वेग थांबवण्यात प्रशासनाला पूर्णपणे अपयश आलेले आहे. जुलै महिन्यात पावसाळा मोठा असतो मात्र या वर्षी पावसाने ओढ दिली आहे. तरीही पावसाळ्यापूर्वी नागरिकांना काही खरेदी करायचे असेल तर फक्त किराणामालाची दुकाने उघडी ठेवून जमणार नाही. इतर सर्वच घटकांचा विचार करावा लागणार आहे.
4,823 पैकी 3,001 बेड रिक्त
जिल्हय़ात विविध कोरोना हॉस्पिटलमध्ये 4 हजार 837 बेड आहेत. त्यापैकी 1 हजार 814 बेडवर दाखल रुग्ण उपचार घेत असून उर्वरित 3 हजार 9 बेड रिक्त असल्याचा सध्या तरी दिलासा आहे. यामध्ये आयसीयू व्हेंटिलेटरसह 105, आयसीयू व्हेंटिलेटरविना 274, ऑक्सिजनसह बेड 2,050 तर ऑक्सिजन विना 600 बेड रिक्त आहेत.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 12,72,291, एकूण बाधित 2,09,030, एकूण कोरोनामुक्त 1,96,928, मृत्यू 5,054 उपचारार्थ रुग्ण 9,084
सोमवारी जिल्हय़ात बाधित 570, मुक्त 1,299, बळी 11