प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण १२५०.७० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण सरासरी १३.७४ मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- ९.१३ (२६१.४२) मि. मी., जावळी- २६.७२ (४५०.९८) मि.मी. पाटण -१८.३६ (४१६.३६) मि.मी., कराड -१३.०० (२०९.३८) मि.मी., कोरेगाव -६.६७ (१९२.४४) मि.मी., खटाव- ७.६१ (१८६.६४) मि.मी., माण- ७.१४ (१२९.८६) मि.मी., फलटण- १.२२ (१६३.११) मि.मी., खंडाळा- ६.०० (१३७.००) मि.मी., वाई – १५.३१ (२६५.६०) मि.मी., महाबळेश्वर-७२.२८ (१२४६.५१) याप्रमाणे आजपर्यंत एकूण ३६५९.३० मि.मी. तर सरासरी ३३२.६६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.