अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 20 डिसेंबर 2021, सकाळी 11.20
● काल दिवसभरात 1685 जणांचे स्वॅब तपासणी
● जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी 0.71 वर
● सातारा तालुका सर्वात जास्त बाधित
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कोरोना वाढ पूर्णपणे थांबण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत आहे. त्यामुळेच नोव्हेंबर प्रमाणे डिसेंबर महिन्यात गेले 20 दिवस बाधित वाढ स्थिर ठेवण्यात यश आले आहे. सोमवारी सकाळी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 1685 जणांचे स्वॅब तपासणी केले तर 12 जण पॉझिटिव्ह आले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 0.71 वर आला आहे.
सातारा तालुका अग्रेसर
जिल्ह्यातील सातारा तालुका सगळ्यात पुढे अजून ही आहे. तरीही सातारा तालुक्यात प्रमाण हे अत्यल्प असे आहे. जिल्ह्यातील जावली, कराड, खटाव, पाटण, वाई, कोरेगाव, महाबळेश्वर या तालुक्यात बाधित वाढ कधी शून्यावर तर कधी 1 ते 2 च्या दरम्यान आढळून येतात. प्रत्येक तालुक्यात बाधित वाढ रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सातारा तालुक्याचे तालुका वैधकीय अधिकारी हे प्रयत्न करत आहेत. त्यांना यश येत आहे.
सोमवारी
नमुने-1685
बाधित-12
सोमवारपर्यंत
नमुने-23,51,317
बाधित-2,52,291
मृत्यू-6,487
मुक्त-2,44,791