अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 27 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.35
● शनिवारी 1097 जणांचे स्वॅब तपासण्यात आले
● पॉझिटीव्हीटी रेट 2.28 वर
● पुर्णपणे अनलॉक कधी होणार याकडे लक्ष
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात दररोज होणारी बाधित वाढ ही आता 25 च्या खाली असून जिल्ह्यातील सर्व व्यवहार नियमितपणे सुरु असले तरीही जे निर्बंध आहेत तेही प्रशासनाकडून हटवून पूर्णपणे जिल्हा निर्बंधमुक्त कधी होईल?, पूर्णपणे जिल्हा अनलॉक कधी होईल याकडे जिल्हावासियांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. दरम्यान, सर्व तालुके कसे निरंक होतील याकडे प्रयत्न आहे.
1097 जणांचे स्वॉब तपासले
जिल्ह्यात बाधित वाढ आता कमी झालेली आहे. ज्यांना लक्षणे असतील त्यांचेच स्वॅब तपासण्यात येतात. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला जेवढी स्वॅब तपासणी करण्यात येत होती. त्याच्या 25 टक्केही स्वॅब तपासणी आता होत नाही. काल दिवसभरात 1097 जणांचे स्वॅब तपासणी करण्यातआले. त्यामुळे आतापर्यंत स्वॅब तपासणी करणाऱ्यांची संख्या 25,50,377 झाली आहे.
जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने
जिल्ह्यात बाधित वाढ दररोज कमी कमी होत आहे. ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक अशी आहे. जिल्हा प्रशासनाने केलेला कोरोनामुक्तीचा निर्धार व त्या दृष्टीने उचललेली पाऊले. त्यास मिळत असलेले यश ही बाब महत्वाची आहे. जिल्हा प्रशासनाकडून दररोज बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्यावर होणारे योग्य उपचार, त्यांना ठणठणीत बरे करुन त्यांच्या कुटुंबियांमध्ये परत पाठवण्यात येत आहे. जेवढे दररोज नव्याने बाधित आढळून येत आहेत, त्याच्यापेक्षा जास्त बरे होत आहेत. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरु आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील 11 तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने आहे. त्याकरता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण हे महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.
कोरोनाचे सर्व निर्बंध कधी हटणार
आज जिल्ह्यात सर्व व्यवहार होत असले तरीही शासनाचे अजूनही काही कोरोनाचे निर्बंध लागून राहिलेले आहेत. ते निर्बंध कधी हटणार?, पूर्णपणे अनलॉक कधी होणार?, पूर्वीप्रमाणे सर्व व्यवहार कसे होणार याकडेच जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. अद्यापही काही निर्बंधामुळे अनेक अडचणींचा सामना सातारकरांना करावा लागत आहे.
रविवारी
नमूने-1097
बाधित-25
रविवारपर्यंत
नमूने-2550377
बाधित-279010
मृत्यू-6675
मूक्त-271478