अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 14 डिसेंबर 2021, दुपारी 12.30
● फलटणला प्रशासन झाले अधिक सतर्क
● सोमवारी तपासण्या 1457 जणांच्या
● कोरोना शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न
सातारा / प्रतिनिधी :
ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासन आणि नागरिक काळजी घेत आहेत. तरीही फलटण येथे चार जण युगांडा येथून आलेले कोरोना बधित आढळून आल्याने तेथील प्रशासन सतर्क झाले आहे. सोमवारी दिवसभरात 1457 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. नव्याने 33 जण बाधित आढळून आले आहेत. बाधित आकडा शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नव्याने बाधित वाढ रोखली
डिसेंबर महिन्याच्या गेल्या तेरा दिवसांत जिल्ह्यातील नव्याने बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. तसेच प्रशासन मेहनत घेत असून, त्यास नागरिकांकडून सहकार्य मिळत आहे. त्यामुळे बाधित वाढ ही पन्नासच्या खाली आहे. ही शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
लसीकरण जोमात
जिल्ह्यातील कोणीही लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य यंत्रणा झटत आहे. जेवढा लसीचा साठा आहे, तेवढाच प्रमाणात लस देण्याचे उद्दिष्ट राखण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे 32 लाख जणांनी लस घेतली आहे. लसीकरण जोमात सुरू आहे.
मंगळवारी
नमुने-1457
बाधित -33
मंगळवारपर्यंत
नमुने- 2333403
बाधित-2,52,126
मृत्यू-6,483