अचूक बातमी “तरूण भारत”ची, रविवार 9 जानेवारी 2022, सकाळी 11.10
● गेल्या चोवीस तासात 3567 तपासण्या
● जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी 9.53 वर
● सातारा तालुका टॉपलाच
● थंड हवेच्या महाबळेश्वरातही बाधित वाढ
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात बाधित वाढ सुरूच राहिलेली आहे. रविवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात नव्याने जिल्ह्यातील 340 जण बाधित आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात 3567 जणांचे स्वाब तपासणी करण्यात आले आहेत. बाधित वाढ सुरूच असल्याने पॉझिटिव्हीटी 9.53वर पोहचली आहे. सातारा तालुका नव्याने बाधित वाढमध्ये टॉपला राहिलेला आहे.
सातारा तालुक्यात बाधित वाढ सुरूच
सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथे बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतानाच त्यांची बाधित आढळून आल्यानंतर नोंद येथेच होते. त्यामुळे सातारा तालुका हा आतापर्यंत नव्याने बाधित वाढ होण्यामध्ये सर्वात टॉपला राहिलेला आहे. आतापर्यंत एकट्या सातारा तालुक्यातील 52 हजार 639 वर पोहचलेली आहे. त्याच प्रमाणे थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात बाधित वाढ आढळून येऊ लागली आहे. सगळ्यात पाठीमागे असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात आतापर्यंत 4,860 जण बाधित आहेत परंतु नव्याने बाधित येणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय अशी आहे.
नियमावलीबाबत नाराजीचा सूर
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात निर्बंध लागू केले गेले आहेत. मात्र, याच निर्बंधांमुळे सर्वसामान्यासह उच्च वर्गीयांची अडचण बनली आहे. पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही असा फतवा काढला गेला आहे. राजकीय कार्यक्रमात नियम नेमके असतात कुठे, अपवाद एखादा नेता मास्क लावतो, इतर नेते मंडळी तर मास्क लावतात कुठे?,सर्वसामान्याचा जरा मास्क तोंडा खाली आला की लगेच पाचशे रुपयांची पावती केली जाते, त्यामुळे शासनाच्या या निर्बंधाबाबत प्रचंड नाराजी सर्वसामान्यामध्ये दिसून येत आहे.
रविवारी
नमुने-3567
बाधित-340
रविवारपर्यंत
नमुने-23,99,679
बाधित-2,57,214
मृत्यू-6500
मुक्त-2,45,305