अचूक बातमी “तरुण भारत” ची, शनिवार 16 ऑक्टोबर सकाळी 09.30
●तपासण्या 2936
●सर्वाधिक 24 रूग्ण साताऱ्यात
●चार तालुके शून्यावर
●तीन तालुक्यात प्रत्येकी एक जण बाधित
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील कोरोनाच्या तपासण्या आता 25 टक्केच होत आहेत. काल दिवसभरात दसऱ्याच्या दिवशी केवळ 2936 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये बाधित संख्या 47 असून पॉझिटिव्हिटी रेट 1.6 वर आलेला आहे. शुक्रवारी दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला गावोगावी अलोट गर्दी झालेली पाहून कोरोना सीमेच्या बाहेरच थांबल्याचे चित्र दिसत होते.
तपासण्या झाल्या कमी
गेल्या महिन्यात जिल्ह्यात तपासण्या दहा ते बारा हजार होत होत्या. तपासण्या जास्त झाल्या तरी रुग्ण संख्या ही कमी आढळून येत होती. टप्याटप्याने तपासण्या आरोग्य विभागाने कमी करत दसऱ्याच्या दिवशी केवळ 2936 जणांच्या तपासण्या केल्या. त्यामुळे तपासण्या कमी झाल्या असल्याने बाधित आढळून येण्याचे प्रमाण ही कमीच राहिले आहे.
47 जणांचा अहवाल बाधित
शुक्रवारी रात्रीच्या अहवालानुसार 47 जणांचा अहवाल बाधित आला असून यात सर्वाधिक 24 रुग्ण सातारा तालुक्यात नोंद झाले आहेत.
आजचे व आजअखेर बाधित झालेल्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी आहे. फलटण 4 (37,266), सातारा 24 (51,733), खटाव 12 (25,783), माण 1 (17,885), कराड 1 (39,106), वाई 0 (15,728), महाबळेश्वर 0 (4,694), खंडाळा 0 (14,166), जावली 1 (10,009), कोरेगाव 4 (21,898), पाटण 0 (10,130), इतर 2 (2,150) असे एकूण 2,50,548 जण आजअखेर बाधित झाले आहेत.
जिल्हय़ात शनिवारपर्यंत
एकूण नमुने-21,83479
एकूण बाधित 2,50,381
एकूण कोरोनामुक्त 2,41,885
एकूण मृत्यू 6,384
सक्रीय रुग्ण 1,353