अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 15 जानेवारी 2022, दुपारी 2.00
● जिल्ह्याची पॉझिटिव्हीटी 21.09 वर
● तपासण्या वाढवल्या, शुक्रवारी दिवसभरात 4567 जणांच्या तपासण्या
● सातारा तालुका अग्रेसर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील बाधित वाढ सुरूच आहे. शुक्रवारी दिवसभरात 963 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत. तपासण्या वाढवण्यात आल्याने काल दिवसभरात 4567 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्याची पॉझिटिव्हीटी 21.09 वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सर्व बाधितांवर योग्य पध्दतीने आरोग्य विभागाच्यावतीने उपचार सुरू आहेत.
सातारा तालुका अव्वल
सातारा तालुक्यातील बाधित वाढ ही ब्रेक घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार यांच्यासह सातारा तालुक्यातील सर्व एमओ आणि खासगी रुग्णालयातले डॉक्टर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरीही सातारा तालुका हा अव्वल राहिला असून तालुक्यातील सातारा शहरात जास्त बाधित आहेत.
कोरोना मुक्तीचा वेग अद्याप कमीच
नव्याने आढळून येणारे बाधित अन कोरोना मुक्त यांचे प्रमाण पाहिले तर अद्याप कोरोनामुक्तीचा दर कमीच आहे. मात्र, उपचार घेणारे जास्त आहेत. मृत्यूदर ही नियंत्रणात आहे.
शनिवारी
नमुने-4567
बाधित-963
शनिवारपर्यंत
तपासणी-24,22,729
बाधित-2,57,284
मृत्यू-6,508
मुक्त-2,46,0836