प्रतिनिधी / सातारा
कडक लॉकडाऊनमध्ये अल्प बाधितवाढ त्यामुळे आलेला निष्काळजीपणा, अनलॉकनंतर कोरोनाने जिल्ह्यात केलेला कहर, त्यामुळे निर्माण झालेले प्रचंड भीतीचे वातावरण, मदतीसाठी पुढे झालेले हजारो हात, आरोग्य विभाग, पोलीस दलाची प्रंटवरची लढाई आणि सुसज्ज कोव्हिड हॉस्पिटल सुरु झाल्यावर मंदावत गेलेली कोरोना बाधित वाढ अशा भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलत लढा आता यशस्वितेकडे जात आहे. डिसेंबर एंडिगकडे वाटचाल करताना नव्या वर्षातील पदार्पण कोरोनामुक्त वातावरणात होण्याच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल जिल्हावासियांना दिलासा देवू लागली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी 108 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासात फक्त 1 बाधिताचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा आलेल्या अहवालात 00 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
साताऱ्यासह सर्व तालुक्यात वेग मंदावला
सातारा तालुक्यात फक्त दोन अंकी संख्येने बाधित वाढ असली तरी वेग मंदावला आहे. तर 9 तालुक्यात फक्त एक अंकी संख्येने बाधित वाढ झाली आहे. सोमवारी रात्रीचा अहवाल दिलासा देणारा असून गेल्या सहा महिन्यात बाधित वाढीची निच्चांकी संख्या नोंदवली गेली. तर महाबळेश्वर तालुक्यात नवीन रुग्ण समोर न आल्याने व मृत्यूदरही कमालीचा घटल्याने सध्या तरी जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु झाल्याचे परिस्थितीवरुन वाटत आहेत.
जिल्ह्यात6,008 पैकी5,533 बेडरिक्त
बाधित वाढ मंदावलीय. कोरोनामुक्तीचा वेग चांगला आहे. सध्या उपचारार्थ रुग्ण संख्या अहवालात 1,179 एवढी दिसत असली तरी प्रत्यक्ष उपचारार्थ 475 एवढेच आहेत. त्यापैकी 407 प्रत्यक्ष दवाखान्यात उपचार घेत आहेत तर फक्त 68 जण कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. बाहेरील जिल्हÎातील उपचारार्थ धरलेल्या संख्या व होम आयसोलेट असल्यांची संख्या 704 एवढी असून नव्या वर्षात प्रवेश करण्यास काही दिवस उरले असताना दुसऱया लाटेची भीतीही हवेत विरुन गेलीय. परदेशात सुरु असलेल्या बातम्या पाहता सध्या तरी जिल्ह्यासह देश धोक्याच्या पातळीच्या बाहेर आहे.
314 जणांचे नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा 18, कराड 17, फलटण 3, कोरेगाव 10, वाई 35, खंडाळा 6, रायगाव 7, पानमळेवाडी 90, महाबळेश्वर 10, पाटण 3, दहिवडी 26, म्हसवड 14, तरडगाव 17 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 58 असे एकूण 314 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
मंगळवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने 2,76,219
एकूण बाधित 54,200
एकूण कोरोनामुक्त 51,227
मृत्यू 1,794
उपचारार्थ रुग्ण 1,179
मंगळवारी
एकूण बाधित 00
एकूण मुक्त 108
एकूण बळी 01