प्रतिनिधी/ रत्नागिरी
कर्नाटक येथे ‘इसिस’च्या छावण्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आह़े राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईत इसिस संघटना रत्नागिरी जिल्हय़ातही बस्तान बसवण्याच्या तयारीत होती, ही बाब समोर आल़ी त्यामुळे रत्नागिरी पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाली असून इसिसच्या हालचालींवर नजर ठेवली जात आह़े
कर्नाटक राज्यातील गुंडलुपेट व शिवनसमुद्र येथे जागतिक अतिरेकी संघटना इसिसचे भारतीय रूप अल-हिंदच्या छावण्या असल्याची माहिती समोर आली आह़े अतिरेकी संघटना येथे प्रशिक्षक देत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणांनी उघड केले होत़े दक्षिण भारतात आपला जोर वाढवण्यासाठी या संघटनेकडून महाराष्ट्रातील रत्नागिरी व गुजरातच्या काही भागात छावण्या बसवण्याच्या तयारीत होत़ी
रत्नागिरी जिह्यातही काही माहिन्यांपूर्वी दहशतवादविरोधी पथक दाखल झाले होत़े समुद्रकिनारी भागाचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी यापूर्वीही करण्यात आला आह़े 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट असो अथवा 26 जुलै रोजीच्या दहशतवाद हल्ल्यामुळे समुद्रकिनारे अतिरेक्यांसाठी सोपे माध्यम ठरत आहेत़ दरम्यान स्थानिकांच्या मदतीने रत्नागिरी कोस्टगार्ड, रत्नागिरी सागरी पोलीस देशविरोधी हालचालींवर नजर ठेवून आहेत़
इसिस या अतिरेकी संघटनेने भारतीय मॉडेल अल-हिंद नावाने देशात विविध ठिकाणी छावण्या सुरू केल्या आहेत़ कर्नाटकातील कोलार तसेच शिवनसमुद्र व चामराजनगर जिल्हय़ातील गुंडलुपेट येथे या छावण्या आढळून आल्या आहेत़ येथे प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात येत होत़ी तसेच जंगलात कसे वास्तव्य करावयाचे, याचेही प्रशिक्षण दिले जात होत़े राष्ट्रीय यंत्रणेच्या तपासात जिह्याचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आह़े तसेच गुप्तचर यंत्रणांनीही देशविरोधी हालचालींवर करडी नजर ठेवण्यास सुरूवात केली आह़े