प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील इतर तालुक्मयांपेक्षा बेळगाव शहर व तालुक्मयात कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ होत आहे. शनिवारी एका बेळगाव तालुक्मयातील सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून जिल्हय़ातील 213 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी अथणी, चिकोडी, बैलहोंगल, गोकाक, हुक्केरी, खानापूर, रामदुर्ग, रायबाग, सौंदत्ती तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्हय़ातील सक्रिय रुग्णसंख्येत थोडीशी घट झाली असून ही संख्या 86 वर पोहोचली आहे.
अद्याप 2 हजार 936 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. एकूण बाधितांची संख्या 80 हजार 104 वर पोहोचली आहे. यापैकी 79 हजार 70 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून मृतांचा सरकारी आकडा 948 इतका आहे.