मंगळवारी आढळले 93 नवे रुग्ण
प्रतिनिधी /बेळगाव
मंगळवारी जिल्हय़ातील 417 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 93 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तरी देखील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
आतापर्यंत 74 हजार 902 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते तर 71 हजार 587 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 2 हजार 370 जण सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध इस्पितळ व कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 747 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे जिल्हय़ाला दिलासा मिळाला आहे.
सोमवार दि. 21 पासून अनलॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये गर्दी वाढताना दिसत आहे. वर्दळही वाढली आहे. त्यामुळे आणखी रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मंगळवारी भाग्यनगर, आझाद गल्ली, शास्त्रानगर, सदाशिवनगर, टिळकवाडी, सिद्धेश्वरनगर यासह परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागामध्ये कंग्राळी खुर्द, हिंडलगा, कलखांब, सुतगट्टी या गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत.