प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी जिल्हय़ातील 573 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर बेळगाव शहरातील पाच जणांसह जिल्हय़ात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या चौघा जणांना घरी पाठवण्यात आले आहे.
टिळकवाडी, नानावाडी, जुने बेळगाव, रायबाग तालुक्मयातील कप्पलगुद्दी येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी टिळकवाडी परिसरातील दोघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. अद्याप 99 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 966 इतकी झाली असून त्यापैकी 26 हजार 525 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 755 जणांचे अहवाल यायचे आहे. तर जिल्हय़ातील 21 हजारांहून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. राजधानी बेंगळूरसह जिल्हा पातळीवर तपासणी वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.