कोरोनामुक्त गावांमध्ये प्राधान्याने लसीकरण : जिल्हा परिषद अध्यक्षांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 90 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. कोरोना येऊन दीड वर्ष झाले, तरी या गावाने कोरोनाला शिरकाव करू दिलेला नाही. त्यामुळे जिल्हय़ातील ही 90 महसुली गावे कोरोनामुक्त राहिलेली आहेत. या गावातील लोकांना प्राधान्याने लस देण्यात येणार असून तशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.
जिल्हय़ामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना या दुसऱया लाटेमध्येही जिल्हय़ातील 90 महसुली गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळलेले नाहीत. या गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना चांगल्या तऱहेने राबविण्यात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राकडील कोविड लसीकरणाची नियमित सत्रे नेहमीप्रमाणे सुरू राहतील. तसेच हात धुणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे या त्रिसुत्रीचा वापर करून कोरोनापासून बचाव करायचा आहे.
90 महसुली कोरोनामुक्त गावांमध्ये तसेच सक्रिय रुग्णसंख्या नियंत्रण होऊन अशा गावांमध्ये कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसींचे सत्र लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. 45 वर्षांवरील ग्रामस्थांनी या सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
तालुकानिहाय कोरोना मुक्त गावे पुढीलप्रमाणे : कणकवली – बंदरगाव, शेर्पे, बेर्ले, मठ खुर्द, कळसुली, सावडाव, ब्रह्मनगरी, कासरल, सांगवे-नवनगर, भिरवंडे-नेहरुनगर, भिरवंडे-सुभाषनगर, सांगवे-संभाजीनगर, नरडवे-भैरवगाव, जांभुळगाव, येवतेश्वर. दोडामार्ग तालुका – तेरवण, फुकेरी, खडपडे. देवगड तालुका – फणसे, मोहुल, जुवेश्वर, चिंचवाड, पाळेकरवाडी, उंडिल, बुरंबावडे, मालपे, वेळगिवे, शिरवली, शेराघेरा कामते, निमतवाडी, बगताळेवाडी. वेंगुर्ले : खालची केरवाडी, पलताड, सातवायंगणी. कुडाळ : घाडीगाव, सोनवडे-दुर्गानगर, पणदूर-नेहरूनगर, मिटक्मयाचीवाडी, बेलनदी, कुसगाव, भडगाव, वसोली, साकिर्डे, कंडुली, कवठी, चेंदवण-गांधीग्राम, चेंदवण-नाईकनगर, गावधड, मुणगी. मालवण तालुका – घाडीवाडी, मालडी, आडवली, मठ बु., कुडोपी, बुधवळे, बांदिवडे बु., कोईल, बांदिवडे खु., सय्यद जुवा, माळवाडी, जामडुल, हिर्लेवाडी, तेरी, पालकरवाडी, अपराजवाडी, चंदेर, खाजणवाडी, मागवणे, देऊळवाडा, आंगणेवाडी, वाडी डांगमोडे, बिळवस, डांगमोडे, तिरवडे, पराड, सोनारवाडी, मोगरणे, वायंगवडे, खालची देवली, माळकेवाडी, परबवाडा, बागवाडी, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, टेंबवडे, नागझर, मळा, वाक, वाघवणे.