तिसऱया लाटेच्या मुकाबल्यासाठी प्रभावी अंमलबजावणी : 186 नवे रूग्ण, 4 जणांचा मृत्यू,286 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी /सातारा
जिल्हय़ात लसीकरणाचा वेग कायम असला तरी लसीकरण केंद्र आता ओस पडू लागली आहेत. यातच तिसऱया लाटेचा धोकाही कायम असल्याने जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी कोविड लसीकरण कवचकुंडल मोहीम 8 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. यात संबंधित यंत्रणांनी लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन मोहीम यशस्वी राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या अहवालात 186 जण पॉझिटिव्ह आले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सायंकाळी 286 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
लसीकरणासाठी टास्क फोर्सच्या बैठका घेण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोविड लसीकरण कवचकुंडल मोहीम राबविण्याबाबत जिल्हा सुकाणू समितीची आढावा बैठक घेण्यात आली. तिसऱया लाटेचा संभाव्य धोका पाहता मोहीम गतीने राबवा, यासाठी गावनिहाय यादी तयार करावी. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सहभाग घ्यावा. या मोहिमेत नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज नाही. लसीकरण केंद्रावर आल्यानंतर लसीकरण करावे. तसेच या मोहिमेसंदर्भात तालुका टास्कफोर्सची तात्काळ बैठक घ्या. प्रत्येक विभाग निहाय जबाबदाया देण्यात आलेल्या आहेत. त्या जबाबदाऱया समन्वयातून पार पाडाव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी यावेळी दिल्या.
पॉझिटिव्हीटी रेट 2.6 टक्के
कोरोनाच्या संकटाची जाणीव ठेवूनच जिल्हय़ात शारदीय नवरात्रास प्रारंभ झाला. निर्बंधांचे पालन भाविकांकडून होत आहे. कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात असलेल्या भागात नवरात्र उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गुरूवारी सकाळी आलेल्या अहवालात 7 हजार 316 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून 190 रूग्णांची वाढ झाली आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट 2.6 टक्के झाला असून त्यात घट झाली आहे.
कराड तालुक्यात 40 रूग्ण
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 186 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात कराड तालुक्यात 40 तर सातारा तालुक्यात 37 रूग्णांची वाढ झाली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. जावली 6 (9989), कराड 40 (39038), खंडाळा 4 (14128), खटाव 14 (25659), कोरेगांव 11 (21853), माण 28 (17799), महाबळेश्वर 1 (4678), पाटण 16 (10117), फलटण 16 (37113), सातारा 37 (51504), वाई 5 (15703) व इतर 8 (2135) असे आज अखेर एकूण 249716 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
सातारा तालुक्यात 3 जणांचा मृत्यू
गेल्या चोवीस तासात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा तालुक्यातील 3, वाई तालुक्यातील 1 अशा 4 जणांचा समावेश आहे. डिस्चार्ज वाढला जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 286 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. बाधितांपेक्षा डिस्चार्जमध्ये वाढ झाली आहे.