45 वरील लाभार्थ्यांसाठी कोव्हॅक्सिन दुसरा डोस
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना लसीकरणासाठी प्रशासनस्तरावर जिल्हय़ात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवार 11 मे रोजीही जिल्हय़ात लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्डचा पहिला तर 45 वयोगटावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस दिला जाणार आहे. गेले अनेक दिवस पहिल्या डोस व दुसऱया साठी प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
जिल्हय़ासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे एकूण 27 हजार 720 डोस प्रात्त झाले आहेत. यात कोविशिल्डच्या 16 हजार 700 आणि कोव्हॅक्सिनच्या 1 हजार 20 डोसचा समावेश आहे. कोरोना लसीकरणावेळी ऑनलाईनमुळे गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कडक सूचनाही दिलेल्या आहेत. पूर्वी पुणे येथून कोरोना लस जिल्हा परिषदेत आणून ती सर्व केंद्रांवर वितरीत केली जात होती. य्ािंतील कालोपव्यय टाळण्यासाठी आता थेट वातानुकूलित व्हॅन केंद्रावरच नेण्यात येणार आहे.
11 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्डची पहिली मात्रा सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. शहरी भागात मंडणगडमध्ये नूतन हायस्कूल, दापोलीत सोहोनी विदय़ामंदिर, खेडमध्ये नगर परिषद दवाखाना, गुहागर येथे जीवन शिक्षण शाळा, चिपळूण येथे पोलीस हॉल व नागरी दवाखाना येथे लसीकरण होणार आहे. संगमेश्वर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय देवरूख, रत्नागिरीत नागरी दवाखाना कोकणनगर, पटवर्धन हायस्कूल व मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी येथे सत्रे होणार आहेत. लांजा व राजापूर येथे ग्रामीण रुग्णालयांत लसीकरण सत्रे होणार आहेत. ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर लसीकरण होणार आहे.
याचदिवशी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस 45 वर्षावरील नागरिकांना दिला जाणार आहे. त्यासाठी दुपारी 3 ते 6 अशी वेळ ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये मंडणगडमध्ये नूतन हायस्कूल, दापोलीत सोहोनी विदय़ामंदिर, खेडमध्ये सहजीवन हायस्कूल, गुहागर येथे जीवन शिक्षण शाळा, चिपळूण येथे नागरी दवाखाना चिपळूण येथे होणार आहे. संगमेश्वर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय देवरूख, रत्नागिरी येथे मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी, लांजा येथे लांजा हायस्कूल व राजापूर तालुक्यात राजापूर हायस्कूल येथे लसीकरण ही सत्रे होणार आहेत. लसीकरणासंदर्भात नागरिकांना काही शंका किंवा माहिती हवी असल्यास दूरध्वनी क्रमांक 02352-221403 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावरुन करण्यात आले आहे.