रत्नागिरीतील 3 तर गुहागरमधील एकाचा समावेश, कोरोना बळींची एकूण संख्या 91 वर 93 नवे रूग्ण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोना रूग्णांच्या संख्येने अडीच हजारांचा टप्पा ओलांडला असून आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 3 तर गुहागरमधील एका रूग्णाचा समावेश असून कोरोनाबळींची एकूण संख्या 91 वर पोहचली आहे. दरम्यान, 24 तासांत 93 नवे रुग्ण सापडल्याने बाधीतांची संख्या 2580 झाली आहे. तर आतापर्यंत 1769 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आणखी 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील उद्यमनगर येथील 83 वर्षीय महिला, लाला कॉम्प्लेक्स येथील 59 वर्षीय रुग्ण आणि माळनाका येथील 65 वर्षीय रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. त्याचबरोबर गुहागर तालुक्यातील कोंडकारळ येथील 38 वर्षीय रुग्णाचाही उपचार सुरू असताना मृत्यु झाला. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृत्युची संख्या 91 झाली आहे.
गेल्या 27 तासांत 93 पॉझिटिव्ह रूग्ण सापडले असून त्यात रत्नागिरी 20, कळबणी -16, दापोली 12, कामथे 12, लांजा 1, रायपाटण 1 व देवरुखमध्ये 1 नवा रूग्ण आढळला आहे. त्याचबरोबर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 30 जण पॉझिटिव्ह आढळले आहे.
आणखी 153 जण बरे
जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 5, घरडा 7, कळबणी 4, वेळणेश्वर 10, दापोली 12, समाजकल्याण 85, पेढांबे 17,, माटे हॉल, चिपळूणमधील एक जण बरा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर होम आयसोलेशनमील व इतर जिल्हयात उपचार घेणारे असे 12 जण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1769 झाली आहे.
18 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 21 हजार 380 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील 2580 अहवाल पॉझीटीव्ह तर 18 हजार 202 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 586 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
2 लाख 80 हजार व्यक्ती जिल्हय़ात दाखल
परराज्यातून व अन्य जिह्यातून रत्नागिरी जिह्यात 12 ऑगस्ट अखेर एकूण 2 लाख 80 हजार 719 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 19 हजार 559 आहे.
खेडमध्ये 18 नवे रूग्ण
बुधवारी रात्री प्राप्त अहवालानुसार खेड तालुक्यात आणखी 18 नव्या रूग्णांची भर पडली असून यामध्ये ऍन्टीजन चाचणीत तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील कुंभारआळी, चिंचघर व वेरळ येथे प्रत्येकी 2 तर कासारआळी, आंबये, साखरोली, शिवतर, लोटे, कळंबणी, कुरवळ-जावळी, भरणेतील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. ऍन्टीजेन चाचणीत राजवेल मोहल्ला, बोरज, डाकबंगला येथील रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नव्या 18 रूग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 453 वर पोहचली आहे.
राजापूरात आणखी 4 पॉझिटीव्ह
राजापूर शहरासह लगतच्या कोंढेतड येथे 3 व शहरातील दिवटेवाडी येथे एक नवा कोरोना रूग्ण सापडला आहे. यातील तिघे ऍन्टीजेन टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 90 झाली आहे. यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला असून 64 जण उपचाराअंती बरे झाले आहे. तर 19 रूग्ण उपचार घेत आहेत.
मंडणगडात 3 नवे रूग्ण
गणेशोत्वासाठी तालुक्यातील धुत्रोली येथे आलेल्या एकाच कुटुंबातील 3 चाकरमान्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 41 झाली आहे. गुरूवारी एसटीने तालुक्यात दाखल झालेल्या प्रवाशांची ऍंन्टीजिन तपासणी करण्यात आली. यामध्ये या तिघांना कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या तिघांना कोणताही त्रास होत नसल्याने त्यांना हाम क्वारंटाईन करण्यात आले आहे.