प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ात आणखी दोघे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसोलेशन कक्षातून घरी पाठविण्यात आले. शनिवारी बेळगुंदी येथील रुग्ण कोरोनामुक्त झाला होता. मंगळवारी आणखी दोघेजण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत जिल्हय़ात एकूण तिघेजण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली. हिरेबागेवाडी येथील 20 वर्षाचा युवक आणि रायबाग तालुक्मयातील कुडची येथील 40 वषीय इसम कोरोनामुक्त झाल्याने त्यांना मंगळवारी घरी पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी कळविले आहे. या दोघांनाही दि. 1 एप्रिल रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बिम्समधील आयसोलेशन कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हिरेबागेवाडी येथील 20 वषीय युवक (रुग्ण क्रमांक 128) आणि रायबाग तालुक्मयातील कुडची येथील 40 वर्षाच्या (क्रमांक 148) व्यक्तीचा यात समावेश होता. मंगळवारी हे दोघेही कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे सरकारच्या मार्गसुचीनुसार त्यांना सरकारी रुग्णवाहिकेतून घरी पाठवून देण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना घरात आवश्यक खबरदारी तसेच नियमांचे पालन करण्याबाबत सल्ला दिला आहे. मंगळवारी विलगीकरण कक्षाबाहेर त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनी टाळय़ा वाजवून या दोघांनाही निरोप दिला.