कणकवली तालुक्यातील सर्वाधिक आठ : कोरोना बाधित एकूण रुग्णसंख्या 522
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बरे होणाऱया रुग्णांचेही प्रमाण वाढत असून मंगळवारी एकाच वेळी 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 364 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर जिल्हय़ात आणखी 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना सक्रिय रुग्ण 150 आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी दिली. मंगळवारी नव्याने 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोना बाधित एकूण रुग्णसंख्या 522 झाली आहे. आतापर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सतरा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कणकवली तालुक्मयातील आठ, मालवण तालुक्मयातील चार, कुडाळ तालुक्मयातील एक, सावंतवाडी तालुक्मयातील तीन आणि देवगड तालुक्मयातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. 17 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी कासार्डे सहा, ओझरम एक, मालवण एक, तळगाव एक, आंगणेवाडी एक, कट्टा एक, ओरोस एक, सोनुर्ली एक, बांदा एक, सातार्डे एक. दोन रुग्णांची गावे समजू शकली नाहीत.
जिल्हय़ात मंगळवारी आणखी 1 हजार 310 चाकरमानी जिल्हय़ात दाखल झाले. त्यामुळे 1 ऑगस्टपासून मंगळवारपर्यंत 11 दिवसात 33 हजार 105 चाकरमानी जिल्हय़ात दाखल झाले आहेत.
कंटेनमेंट झोन
दोडामार्ग तालुक्मयातील शिरंगे पुनर्वसन खानयाळे, नाईकवाडी येथील नारायण मोहन नाईक यांच्या घरालगतच्या 50 मीटर परीक्षेत्राच्या हद्दीमध्ये 23 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत, सावंतवाडी तालुक्मयातील चराठे-वझरेवाडी येथील स्नेहलता सीताराम नाईक व नूतन सीताराम नाईक यांच्या घरालगतच्या 50 मीटर परिक्षेत्राच्या हद्दीमध्ये 23 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत, देवगड तालुक्मयातील नाडण वीरवाडी येथील पांडुरंग नारायण भाबल तसेच जामसंडे तुळशीकाटा येथील दिनेश मधुसुदन साधये यांच्या घरापुरता परिसर 24 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत, कुडाळ तालुक्मयातील कसाल नवा बाजार येथील कोचरेकर यांचे राहते घर हे केंद्रबिंदू मानून घराच्या 50 मीटर परिघक्षेत्राच्या हद्दीमध्ये 21 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तसेच ओरोस आदर्शनगर, आक्सी होम हे केंद्रबिंदू मानून 50 मीटर परिघक्षेत्राच्या हद्दीमध्ये 20 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आणि सोनवडे येथील सोनवडे मठवाडी येथील देसाई यांचे घर केंद्रबिंदू मानून 50 मीटर परिघक्षेत्राच्या हद्दीमध्ये 23 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 8137
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 522
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 7453
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 162
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 150
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 364
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 19296
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3949
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 193537
सद्यस्थितीत सक्रीय कंटेनमेंट झोन 52