प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बुधवारीही कोरोना बाधित 101 रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन हजाराचा आकडा पार करीत 2 हजार 86 झाली आहे. सावंतवाडी येथील 70 वर्षीय एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच बुधवारी एकाच दिवशी 78 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नव्याने आढळलेल्या 101 रुग्णांमध्ये कणकवली तालुक्मयातील भाजपचा एक जिल्हास्तरीय पदाधिकारी, कुडाळचा एक बिल्डर तसेच कुडाळ व ओरोस येथील सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 31 वर पोहोचली आहे. कोरोनावर मात करणाऱयांनीही एक हजाराचा टप्पा गाठला आहे. 1 हजार 49 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत 1 हजार 6 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
एकूण अहवाल 17,609
पॉझिटिव्ह आलेले अहवाल 2,086
निगेटिव्ह आलेले अहवाल 15,316
प्रतीक्षेतील अहवाल 207
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 1006
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 31
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 1,049
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 8,467
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12,266
8डीएमजी5ते 11
वन्यजीव अभ्यासक
8डीएमजी9-संजय सावंत
8डीएमजी10 -अमित सुतार
8डीएमजी 11-तुषार देसाई