कोरोनामुक्त झालेल्या 27 जणांना पाठविले घरी : सक्रिय 174 रुग्णांवर इस्पितळात उपचार
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिह्यातील आणखी 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये शहर व उपनगरांतील 10 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 27 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. 174 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकात 14 रुग्णांचा उल्लेख करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात बुधवारचा आकडा 19 इतका आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 242 इतकी झाली असून त्यापैकी 26 हजार 721 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिह्यातील 5 लाख 64 हजार 567 जणांची आतापर्यंत स्वॅब तपासणी केली आहे. त्यापैकी 5 लाख 32 हजार 14 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अद्याप 2274 जणांचे अहवाल यायचे आहेत. तर 24 हजार 616 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. पिरनवाडी, हिरेबागेवाडी तालुक्मयातील दोन गावांसह हिंदवाडी, विनायकनगर, शहापूर, आझमनगर, शिवबसवनगर, टिळकवाडी व जेएनएमसी कॅम्पसमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबरच चिकोडी तालुक्मयातील सिदनाळ, जोडकुरळी, यमकनमर्डी (ता. हुक्केरी), कणकुंबी (ता. खानापूर), बैलहोंगल, गुंजी, हिरेहट्टीहोळी, अक्कोळ येथेही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.