सातारा तालुक्यात रुग्ण वाढले , सोनापुरात संसर्ग साखळी 36 बाधित
सातारा प्रतिनिधी
कोरोनाच्या अंतिम टप्प्यातील लढाईने उग्र रुप धारण करत जिल्हय़ाच्या कानाकोपऱयात अस्तित्व दाखवले आहे. दुसरीकडे मुंबई व दिल्ली सारख्या कार्पोरेट शहरात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी सातारा जिल्हय़ात रात्रीच्या अहवालात दररोज बाधितांची संख्या वाढतच आहे. जिह्यात तपासणींचा वेग वाढवल्यानंतर आता लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधितांना घरीच राहून उपचार घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने होम आयसोलेशनचा पर्याय पुढे आणत रणनिती बदलली असून त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची पुस्तिका जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रसिध्द केली आहे.
दरम्यान रविवारी रात्री आलेल्या अहवालात 141 बाधित समोर आले असून रात्री उशिरा आलेल्या अहवालात …..जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर सोमवारी रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित झाला . कारण 90 एवढय़ा मोठया संख्येने जिल्हय़ातील नागरिकांनी कोरोनावर मात करत लढय़ातील दिलासा जागृत ठेवला आहे.
जिल्हय़ात होम आयसोलेशन
जिल्हय़ात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचे दिसत असले तरी दुसरीकडे कोरोनामुक्तीचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनाच्या लक्षणांबाबतचा गोंधळही आता प्रशासनाने घेतलेल्या होम आयसोलेशनच्या निर्णयामुळे दूर होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबतची मार्गदर्शिका प्रसिध्द केली आहे. ज्यांना कोणतेही लक्षणे नाही व ज्यांना सौम्य लक्षणे आहेत अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी घाबरुन न जाता घरात राहूनच आरोग्य विभागाच्या साथीने कोरोनावर मात करता येणार आहे. रुग्ण बाधित आढळल्यास त्यांच्या लक्षणानुसार होम आयसोलेशन बाबत निर्णय घेण्यात येणार आहे होम आय सोलेशन काळात या रुग्णांना आरोग्य विभागाकडून सर्वव मदतही केली जाणार आहे.
जिल्हय़ातील 90 जणांची कोरोनावर मात
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 90 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये कराड तालुक्यातील 36 जणांनी कोरोनावर मात केली असून खंडाळा 11, सातारा 15, वाई 10 तर फलटण तालुक्यातील 17 जणांनी लढा जिंकला आहे.
यामध्ये खंडाळा तालुका : रामबाग सिटी शिरवळ 37 वर्षीय पुरुष 14 वर्षीय बालक, तळेकर वस्ती 11 महिन्याची बालिका, सांगवी 19 वर्षीय तरुणी, नायगाव 7 वर्षीय बालक, शिर्के कॉलनी शिरवळ 34 वर्षीय पुरुष, स्टार सिटी शिरवळ 38 वर्षीय महिला, विंग येथील 44, 52, 23 वर्षीय पुरुष, जवळे 34 वर्षीय पुरुष.
कराड तालुका : शामगाव 60 वर्षीय महिला, सैदापूर 47 वर्षीय महिला 25 वर्षीय पुरुष, शेणोली 75 वर्षीय पुरुष, किवळ 65 वर्षीय पुरुष, 55, 34, वर्षीय महिला 13 वर्षीय बालिका, 10 वर्षीय बालक, कालेगाव 28, 65, 28 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, येवती 24 वर्षीय पुरुष, शामगाव 21 वर्षीय पुरुष 42 वर्षीय महिला, रविवार पेठ 42 वर्षीय पुरुष, म्हासोली 30 वर्षीय पुरुष, सैदापूर 62 वर्षीय पुरुष 56, 28 वर्षीय महिला व 8 वर्षीय बालिका, शामगाव येथील 38 वर्षीय पुरुष, श्रध्दा क्लिनिक 38 वर्षीय महिल। 41 वर्षीय पुरुष, शामगाव 33 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालिका, किवळ 32 वर्षीय महिला, कासनी 38 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, 27 वर्षीय महिला, कालवडे 6 वर्षीय बालक, शुक्रवार पेठ 38 वर्षीय पुरुष 6, 12 वर्षीय बालक 34 वर्षीय महिला, कालवडे 65 वर्षीय महिला.
सातारा तालुका : सातारा यशवंत हॉस्पिटल येथील 34 वर्षीय महिला, अमर लक्ष्मी देगांव 38, 45 वर्षीय महिला 12 वर्षीय बालक 14 वर्षीय बालीका 52, 22 वर्षीय पुरुष, कण्हेर 45 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ 26, 53 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालक 5, 5 वर्षीय बालीका 30 वर्षीय पुरुष, माची पेठ 30 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील वडुज 66 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील मलठण 3 वर्षीय बालीका, 22, 26, 60 वर्षीय महिला 37, 40 वर्षीय पुरुष, रिंग रोड 87, 50 वर्षीय पुरुष 77, 45, 38 वर्षीय महिला 16, 10 वर्षीय बालक, रामबाग कॉलनी येथील 62, 38 वर्षीय महिला 38 वर्षीय पुरुष 10 वर्षीय बालक. वाई तालुक्यातील शेंदूरजणे 38, 59, 35 वर्षीय महिला 15, 14, 12, 6 वर्षीय बलिका, 14 वर्षीय बालक, 34, 42 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
561 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा 23, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 85, उपजिल्हा रुग्णालय फलटण 29, वाई येथील 44, खंडाळा 86, पानमळेवाडी 27, मायणी 27, महाबळेश्वर 9, पाटण 55, दहिवडी 27, खावली 38 व कृष्णा हॉस्पिटल कराड 111 असे एकूण 561 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीस पाठवण्यात आले असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.