रविवारी आणखीन 12 रूग्णांची भर, एकूण 361
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रविवारी सकाळी 31 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांमध्ये 12 रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 19 रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
रत्नागिरी जिल्हय़ातील कोरोना रूग्णांची संख्या 27 जून पर्यंत 1 हजारांपर्यंत पोहचण्याची संख्या आरोग्य यंत्रणेने यापूर्वीच शक्यता वर्तवली आहे. दररोज 10 ते 20 रूग्ण आढळत आहेत. शनिवारी सर्व अहवाल निगेटीव्ह आल्याने शनिवारी दिवसभर दिलासा मिळाला. आता पुन्हा कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढली आहे. नवीन अहवाल प्राप्त झाल्याने आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या आता 355 झाली आहे. पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांमध्ये संगमेश्वरमधील 9, राजापूर 2 आणि कामथे येथील 1 रूग्णाचा समावेश आहे.