प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात शुक्रवारी कोरोनामुळे दोघाजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर नव्याने 67 रूग्ण आढळून आले आहेत़ यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 35 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 32 रूग्ण आढळून आले आहेत़ जिल्हय़ात एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7 हजार 566 झाली आह़े
या बाबत जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मृत झालेल्यांमध्ये रत्नागिरी येथील 80 वर्षीय महिला तर चिपळूण येथील 58 वर्षीय पुरूषाचा समावेश आह़े यामुळे जिह्यातील मृतांची संख्या 269 झाली आह़े रत्नागिरी जिह्याचा मृत्यूदर 3.5 टक्के आह़े शुक्रवारी आढळून आलेल्या रूग्णांमध्ये रत्नागिरी 37, चिपळूण 17, गुहागर 3, राजापूर 2, खेड 3, अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 74, खेड 45, गुहागर 10, दापोली 29, चिपळूण 66, संगमेश्वर 24, लांजा 9, राजापूर 10 तर मंडणगडमध्ये 2 अशा एकूण 269 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े
राजापुरात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू
राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील एका परप्रांतिय कामगाराचा जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोनावर उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे. गोठणे दोनिवडे येथील एक परप्रांतिय कामगाराला आठवडाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचार सुरू असतानाच बुधवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान बुधवारी नव्याने चार कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. वरचीपेठ, हर्डी, हातदे गाववाडी व वडवली शिवाजीनगर येथील रूग्णांचा समावेश आहे. तर दोघेजण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.