प्रतिनिधी/ रत्नागिरी
बुधवारी जिह्यात एका दिवसातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी तब्बल 791 कोरोना रुग्णांची वाढ झाली आह़े आरटीपीसीआर चाचणीमध्ये 601 तर, अँटीजन चाचणीमध्ये 190 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या 21 हजार 69 झाली आह़े
गेल्या काही दिवसांमध्ये जिह्यात सातत्याने पाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यात अनेकदा सहाशेचा टप्पाही ओलांडला जात आहे. यावर कडी करत बुधवारी तब्बल 791 नवे रुग्ण आढळल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनल्याचे संकेत मिळत आहेत.