आणखी एक पॉझिटिव्ह : पाचजणांना डिस्चार्ज : कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 25
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोविड-19 आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱयांच्या नियंत्रणाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हय़ात टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हय़ात गुरुवारी आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला, तर पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता कोरोना सक्रिय रुग्ण 25 आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी दिली.
जिल्हय़ात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला असून तो देवगड तालुक्मयातील बाबर्डे येथील आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णसंख्या 265 झाली आहे. आतापर्यंत एकूण 234 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण मुंबईला गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ात आता कोरोना सक्रिय रुग्ण 25 राहिले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
कोविडसाठी टास्क फोर्स
कोविड-19 या आजाराने त्रस्त असलेल्या गंभीर व अतिगंभीर रुग्णांबाबत रुग्ण व्यवस्थापन संहिता, योग्य औषधोपचार, कोविड रुग्णालयात विशेष तज्ञ डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ यांची आवश्यकता सुनिश्चित करणे, याबाबत उपाययोजना निश्चित करणे व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्याची अंमलबजावणी करणे यासाठी टास्ट फोर्स काम करणार आहे.
या टास्क फोर्समध्ये शासकीय तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश आहे. टास्क फोर्समध्ये समावेश असलेल्या डॉक्टरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. डॉ. शंतनू तेंडोलकर (एम. डी. मेडिसीन), डॉ. वादिराज सवदत्ती (एम. डी. ऍनेस्थेशिया), डॉ. बी. जी. शेळके (एम. डी. चेस्ट व टीबी), डॉ. सोनल घोगळ (एम. डी. मायक्रोबायोलॉजी), डॉ. महेश खलिपे (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. श्रीपाद पाटील (वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा सामान्य रुग्णालय), डॉ. विवेक रेडकर (एम. डी. मेडीसीन) यांचा समावेश आहे.
जांभुळगाव ब्राह्मणवाडी येथे कंटेनमेंट झोन
कणकवली तालुक्मयातील जांभुळगाव-ब्राह्मणवाडी येथील 500 मीटर परिसर क्षेत्रातील 51 घरांमधील 36 कुटुंबातील 183 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हा झोन 28 जुलैपर्यंत राहणार आहे.
वराड मोऊळवाडी येथे कंटेनमेंट झोन
मालवण तालुक्मयातील वराड-मोऊळवाडी येथील 300 मीटर परिसर क्षेत्रात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. हा कंटेनमेंट झोन 27 जुलैपर्यंत राहणार आहे. या दोन्ही झोनमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहेत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 4535
अहवाल प्राप्त झालेले नमुने 4494
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 265
निगेटिव्ह आलेले नमुने 4229
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 41
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 25
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 234
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 52
गुरुवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 4142
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12601
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 49
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 9757
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2795
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 135424