75 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक लसीकरण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ामध्ये आरोग्य विभागामार्फत राबवण्यात आलेल्या कोविड-19 लसीकरणाची ‘ड्राय-रन’ यशस्वीपणे पार पडली. जिल्हयात 75 लाभार्थ्यांना प्रतिकात्मक लसीकरण करण्यात आले. जिल्हा् शासकीय रुग्णालय रत्नागिरी, उपजिल्हा रुग्णालय दापोली व प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा अशा तीन ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हय़ामध्ये तीन ठिकाणी कोविड लसीकरणाची ड्राय-रन पार पडली. मोहिमेचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. कमलापूरकर, तालुका आरेग्य अधिकारी डॉ. एम. डी. गावडे, डॉ. ओंकार निमकर व प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा येथील डॉ. स्वप्निल साळवी उपस्थित होते. या मोहिमेमध्ये डी. डी. जोशी, डी. डी. सुर्वे, डी. डी. गोताड, एस. ओ. चव्हाण यांनी बॉक्सिनेशन ऑफिसर म्हणून काम केले. तर व्ही. एस. देसाई यांनी व्हॅक्सिनेटर म्हणून काम केले.
दापोलीत 25 कर्मचाऱयांची नियुक्ती
दापोली उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरणाची ‘ड्राय-रन’ शुक्रवारी दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. उपजिल्हा रुग्णालयातील 25 कर्मचाऱयांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे. प्र्रत्यक्षात लस येईल तेव्हाची ही सज्जता आहे. यात काही त्रुटी आढळल्यास त्या तत्काळ दूर व्हाव्यात यासाठी ‘ड्राय रन’ घेण्यात आल्याची माहिती डॉ. भागवत यांनी दिली. व्हेक्सिनेशन टीम इन्चार्ज म्हणून डॉ. रामतीर्थ चौगुले, ऑफिसर सुविधा सुर्वे, सुजित भागवत, सिनिअर नर्स सेजल मळेकर, दीपिका नांदगावकर, व्हेक्सिनेटर साक्षी हांडे, सुपरवायझर डॉ. स्वप्नील भोजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अशी होती रंगीत तालीम
ड्राय-रन मोहिमेसाठी जिह्यात 75 लाभार्थ्यांची नोंदणी करुन त्यांना मेसेजव्दारे लसीकरणाचे ठिकाण व वेळ अगोदर कळविण्यात आले. लसीकरणासाठी लाभार्थ्यांची नोंदणी, त्यांना लसीकरण कक्षात पाठवणे, लसीकरण कक्षामध्ये पुन्हा पडताळणी, प्रतिकात्मक लसीकरणानंतर देखरेख कक्षामध्ये अर्धा तास निरीक्षण आदी सर्व पायऱयांची अंमलबजावणी यशस्वीपणे पार पडल्याचे सांगण्यात आले.