प्रतिनिधी/ रत्नागिरी
बुधवारी जिह्यामध्ये 134 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत़ त्यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 74 हजार 557 झाली आह़े बुधवारी 97 जणांनी कोरोनावर मात केल्याने बरे झालेल्याची एकूण संख्या 70 हजार 587 पर्यंत पोहोचली आह़े बुधवारी 3 व या आधीचे 14 अशा एकूण 17 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बुधवारी आरटीपीआर चाचणीमध्ये दापोलीमध्ये 7, मंडणगड व गुहागर प्रत्येकी 2, खेड व राजापूरमध्ये प्रत्येकी 1, चिपळूण 16, संगमेश्वर 10, रत्नागिरी 13 तर लांजा 3 असे एकूण 55 रुग्ण आढळल़े रॅपिड ऍन्टीजन चाचणीमध्ये मंडणगड 2, दापोली 4, खेड 19, गुहागर 3, चिपळूण 23, संगमेश्वर 5, रत्नागिरी 13, लांजा व राजापूर प्रत्येकी 5 असे एकूण 79 रुग्ण आढळले आहेत़ जिह्याचा मृत्यू दर केवळ 1 टक्का झाला आह़े