प्रतिनिधी/सातारा
सातारा जिल्हय़ाचा कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालला असून बाधितांचे आकडे रोज नवा उच्चांक गाठत आहेत. चाचण्यांची संख्या वाढवल्याने बाधितांचे प्रमाणही जास्त येऊ लागले आहे. जिल्हय़ात उपचारात असणाऱया रूग्णसंख्येने 4500 चा टप्पा ओलांडला असला तरी यात लक्षणे नसणाऱया रूग्णांचे प्रमाण प्रचंड आहे. बुधवारी 135 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा आलेल्या अहवालात 505 इतके बाधित आले आहेत.
जिल्हय़ात 20 रूग्णालयात 1000 रूग्ण उपचारात, केअर सेंटरमध्ये 3505
मंगळवारी सायंकाळच्या जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्हय़ात 4505 रूग्ण उपचार घेत असून जिल्हय़ातील 20 रूग्णालयांमध्ये यातील 1000 रूग्ण आहेत. तर 3505 रूग्णांवर विविध ठिकाणच्या कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. कमी, मध्यम अथवा लक्षणे नसलेले रूग्ण कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.ग्न जिल्हय़ात एकुण बाधितांचा आकडा 11 हजारावर गेला असला तरी यात प्रत्यक्ष उपचारात 1 हजार रूग्ण आहेत. उर्वरित कोरोना केअर सेंटरमध्ये आहेत. मात्र नव्याने बाधित होणारांना बेडसाठी धावाधाव करावी लागत आहे.
जिल्हय़ात 9 बाधितांचा मृत्यू
जिल्हय़ात बुधवारी 9 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात शनिवार पेठ सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, संगम माहुली येथील 55 वर्षीय पुरुष, पिरवाडी सातारा येथील 50 वर्षीय महिला, मायणी (ता. खटाव) येथील 65 वर्षीय पुरुष, डिस्कळ (ता. खटाव) येथील 80 वर्षीय महिला तर जिल्हय़ातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कुमठे (ता. कोरेगाव) येथील 86 वर्षीय पुरुष, परळी (ता. सातारा) येथील 72 वर्षीय पुरुष, केसे (ता. कराड) येथील 70 वर्षीय पुरुष, नांदगाव (ता. कराड) येथील 61 वर्षीय पुरुष असे एकुण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
135 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 135 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जावली तालुक्यातील 3, कराड तालुक्यातील 13, खंडाळा” तालुक्यातील 1, *खटाव तालुक्यातील 4, कोरेगाव तालुक्यातील 6, महाबळेश्वर तालुक्यातील 4, पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 67, सातारा तालुक्यातील 27,
वाई तालुक्यातील 3 असे एकूण 135 नागरिकांचा समावेश आहे.
कराड कॉटेजमध्ये चार दिवसांत कोविड कक्ष
कराड शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात 60 बेडचा कोविड कक्ष येत्या चार दिवसांत स्वतंत्रपणे सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा इन्सिडेंट अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात प्रारंभी कोविड कक्ष सुरू होता. मात्र अन्य आजाराच्या रूग्णांना उपचार मिळत नसल्याने हे रूग्णालय अन्य आजाराच्या रूग्णासाठी ठेवावे, असे जनमत वाढल्याने येथील कोविड कक्ष बंद करण्यात आला होता. मात्र रूग्ण वाढल्याने कॉटेजमध्येच काही भागात कोविड कक्ष सुरू करण्यात येत आहे.
455 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 8, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 61, कोरेगाव 53, वाई 39, खंडाळा 30, रायगाव 30, मायणी 56, महाबळेश्वर 21, दहिवडी 11, खावली 19 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 127 असे एकुण 455 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
नवारस्ता बाजारपेठ आजपासून सात दिवस बंद
पाटण तालुक्यातील नवारस्ता बाजारपेठेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने गुरुवार 27 पासून पासून अनंत चतुर्थीपर्यंत नवारस्ता बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय गावसुरक्षा कमिटी आणि व्यापाऱयांनी घेतला आहे. पाटण तालुक्यात कोरोनाने सध्या थैमान घातले असून नवारस्ता परिसरातही मोठय़ा प्रमाणात कोरोना पसरत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आणि व्यापारी यांची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मंगळवारी रात्री 485 पॉझिटिव्ह
जिह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 485 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कराड कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, केआयएमएस 1, रेठरे बु 3, आगाशिवनगर 7, मलकापूर 12, कोळेवाडी 1, विद्यानगर 1, गोळेश्वर 4, शुक्रवार पेठ 4, कार्वे नाका 4, बुधवार पेठ 2, किवळ 3, रुक्मिणी नगर 1, मुजावर कॉलनी 1, शनिवार पेठ 12, श्रद्धा क्लिनीक 1, चरेगाव 1, एसबीआय कॉलनी 2, उंब्रज 5,रविवार पेठ 6, वारुंजी 2, रविवार पेठ 2, साळशिरंबे 1, गरवाडे फाटा 1, गुरुवार पेठ 2, आंबेवाडी रेठरे 1, टेंभू 1, मसूर 7, बाजार पेठ 2, मार्केट यार्ड 2, पाल 1, वाटेगाव 1, खोडशी 2, खुबी 2, येळगाव 5, बेलदरे 1, यशवंत कॉलनी 2, बेलवडे बु 3, कासारशिरंबे 1, काले 2, मुनावळे 2, धोंडेवाडी 2, कोळे 1, येरावडे 1, मातंग वस्ती कार्वे 1, करवडी 3, शेणोली 1, विरवडे 3, ओगलेवाडी 1, नांदलापूर 1, येणके 1, जुळेवाडी 1, घोणशी 1, रुक्मिणी नगर भाग 2 मधील 1, उंडाळे 5, मंगळवार पेठ 2, बनवडी कॉलनी 1, साकुर्डी 1, रेठरे खुर्द 1, घारपीरवाडी 1, बनवडी 1, किर्पे 1, खराडे 3, कोयना वसाहत 1, विठ्ल नगर 2,
सातारा सातारा 2, मोळाचा ओढा 1, शाहुपरी 1, सोमवार पेठ 4, गोडोली 5, देहर 1, निगडी 1, अतित 4, धावडशी 1, गुरुवार पेठ 4, तोबारवाडी 2, कारंडवाडी 1, आरफळ 1, डबेवाडी 4, आसनगाव 1, मंगळवार पेठ 4, प्रतापगंज पेठ 1, शनिवार पेठ 2. माची पेठ 1, शुक्रवार पेठ 1, पाटखळ 1, कोडोली 1, आनेवाडी 5, संगमनगर 1, पानमळेवाडी 1, म्हसवे रोड करंजे 3, राजेवाडी 2, जीवन हॉस्पीटल 1, देगाव 2, तामजाई नगर 1, आशिर्वाद हॉस्पीटल 1, कोपर्डे 1, आदर्श कॉलनी तामजाईनगर 1, वाढे 1, भादवडे 2, कवठे तळवाई 1, देगाव फाटा 1, खोजेवाडी 1, वरणे 1, संगम माहुली 3, प्रतापसिंह नगर 14, सिव्हील कॉलनी 1, बुधवार पेठ 1, गावडेवाडी 1, शाहुपरी 1, काशिळ शहापूर 1, केसरकर पेठ 1, विकासनगर 1, बॉम्बे रेस्टॉरंट 1, पारसनिस कॉलनी सदरबझार 1, शहापूर 1, पाडळी 1, शाहुनगर 1, नागठाणे 1, माजगाव 1, केसकर कॉलनी 1, सिव्हील हॉस्पीटल 2
पाटण तालुक्यातील पाटण 6, मारुल 1, ढेबेवाडी 1, नाडे नवारस्ता 1, शेडगेवाडी 1, ठोमसे 2, मल्हार पेठ ग्रामीण रुग्णालय 2, मल्हार पेठ 2, साबळेवाडी 1, येरपाळे 4, बरमपुरी 2, मारुल हवेली, मिस्तेवाडी 4श् सणबुर 3, कोळे 2, धामणी 1,
कोरेगाव कोरेगाव 4, तालुक्यातील जळगाव 1, धामणेर 2, दत्तनगर 11, अंबावडे 1, किन्हई 1, हिवरे 1, ल्हासुर्णे 1, रहिमतपूर 3, कठापूर 5, सोळशी 1, वाठार पोलीस स्टेशन 1, निगडी 1, पिंपोडे बु 2.
वाई तालुक्यातील बावधन 17, यशवंत नगर 4, उडतारे 2, रविवार पेठ 2, सोनगिरीवाडी 1, पाचवड 5, शेलारवाडी 1
खटाव तालुक्यातील मायणी 2, वडूज 1, डीस्कळ 2, वेटने 3, पुसेसावळी 8, नांदोशी 1, कुरवली 1, सिद्धेश्वर कुरोली 4, मुसंडवाडी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2, वॉटर सप्लाय महाबळेश्वर 1,
जावली तालुक्यातील बहीभावी 1, मेढा 2, जवालवाडी 1, हुमगाव 2, बामणोली 1, भिवडी 2,
खंडाळा तालुक्यातील पाडळी 1, शिरवळ 3, धाबे 1, पळशी 1, लोणंद 6, खेड बु 1, फुले मळा शिरवळ 2, रामेश्वर कॉलनी शिरवळ 1, खराडेवाडी 1, खामगाव 2, पाटणेवाडी 1, शिरवळ 1,
फलटण तालुक्यातील फलटण शहरातील जुना बारामती रोड 1, आदलिंगे मळा 1, विडणी 1, अंदोरी 1, आदर्की बु 1, काळज 1, साखरवाडी 3,
माण तालुक्यातील गोंदवले बु 6, दहिवडी 1, म्हसवड 4, इंजबाव 3, जांभुळणी 1, कळचौंडी 1, लोधाडे 1,
इतर 2.
बाहेरील जिह्यातील नावे – खेड ता. वाळवा, वाळवा जि. सांगली 1, मराठवाडी ता. शिराळा जि. सांगली 1, माजगाव ता. भोर जि. पुणे 1, उंची ठाणे 1, कासेगाव जि. सांगली 1, इस्लामपूर 1.
जिल्हय़ात बुधवारी
एकुण बाधित 505
एकुण मुक्त 135
एकुण बळी 09
जिल्हय़ात बुधवारपर्यंत
घेतलेले एकुण नमुने — 42380
एकुण बाधित — 11643
घरी सोडण्यात आलेले — 6300
मृत्यू — 333
उपचारार्थ रुग्ण — 5010