प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातही ब्लॅक फंगसचे 9 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी अथणी व गोकाक येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हय़ातही ब्लॅक फंगसचा शिरकाव झाल्याचे उघड झाले आहे.
रविवारी पत्रकारांशी बोलताना जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी यासंबंधीची माहिती दिली असून ब्लॅक फंगसचे 9 रुग्ण आढळून आले आहेत. अथणी व गोकाक येथे फंगसमुळेच दोन वृद्धांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही 70 वर्षांवरील आहेत. त्यांचा मृत्यू फंगसमुळे झाला असल्याचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, स्वच्छतेवर अधिक भर द्यावा, मधुमेहींनी मधुमेहावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहनही आरोग्य अधिकाऱयांनी केले असून उपचारामुळे झालेले दुष्परिणाम, ऑक्सिजनमधील अशुद्ध पाणी, एकच मास्क वारंवार वापरणे आदींमुळे संकटात भर पडत असल्याचेही अधिकाऱयांनी सांगितले आहे. केवळ 15 दिवसांत 9 रुग्ण आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणूक कर्तव्य बजावलेल्या शिक्षकांचा मृत्यू
लोकसभा पोटनिवडणुकीत कर्तव्य बजावलेल्या काही शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी हुदली येथील श्रीदेवी हुक्केरी (वय 37) या शिक्षिकेचा मृत्यू झाला असून आतापर्यंत निवडणुकीच्या कामकाजाला उपस्थित राहिलेल्या 12 शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात एकूण 4 शिक्षक दगावले आहे.