तालुक्मयातील 484 जणांचा समावेश, चौघांचा मृत्यू
बेळगाव : कोरोना रुग्णांची संख्या दररोज हजारच्या संख्येतच सापडत आहे. लॉकडाऊन करूनही ही वाढत असलेली संख्या भीतीदायक आहे. रविवारीही तब्बल 1 हजार 135 रुग्ण जिल्हय़ामध्ये आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य खात्याने पुन्हा चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, रविवारीही चार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले असून आतापर्यंत 393 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही जिल्हय़ाची आकडेवारी साऱयांनाच डोकेदुखी ठरणार असून कोरोनाचे नियम पाळणे ही काळाची गरज बनली आहे.
कोरोनाबरोबरच आता चक्रीवादळामुळे पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे साथीचे आजारही उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. तेव्हा प्रत्येकाने काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे. रविवारी तालुक्मयामध्ये 484 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामध्ये शहरातील 380 तर ग्रामीण भागातील 104 जणांचा समावेश आहे. बेळगाव पूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचबरोबर आता अनेक ग्राम पंचायती लॉकडाऊनचा बडगा उगारत आहेत. तेव्हा आता जनतेनेच शहाणे होणे गरजेचे आहे.
कोरोना रुग्णांमुळे शहरातील खासगी रुग्णालये आणि सिव्हिल हॉस्पिटलही फुल्ल झाले आहे. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे स्मशानभूमीमध्येही अंत्यविधी करण्यासाठी ताटकळावे लागत आहे. ही वस्तुस्थिती असताना जनता मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात धन्यता मानत आहे. आरोग्य विभागाने तसेच जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन केले आहे की प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच रुग्णसंख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
रविवारी शहरातील जाधवनगर, शिवाजी कॉलनी, खासबाग, कुकडोळी, शहापूर, कडोलकर गल्ली, कलमेश्वरनगर मजगाव, काळी आमराई, कामत गल्ली, कारभार गल्ली-वडगाव, कोतवाल गल्ली, महांतेशनगर, कुंतीनगर, कुमारस्वामी ले-आऊट, मंगाईनगर-वडगाव, मार्कंडेयनगर, मार्केट यार्ड, मठ गल्ली बेळगाव, नानावाडी, शाहूनगर, शास्त्राrनगर, शिवबसवनगर, शिवाजीनगर, टिळकवाडी, टीचर्स कॉलनी बेळगाव, तेग्गीन गल्ली-वडगाव, न्यू वैभवनगर, नेहरूनगर, जुने बेळगाव, जुने गांधीनगर, रामतीर्थनगर, शांतीनगर, राणी चन्नम्मानगर, राजारामनगर-उद्यमबाग, सहय़ाद्रीनगर, संभाजीनगर-वडगाव, संगमेश्वरनगर, सदाशिवनगर, हिंदवाडी, वडगाव, वैभवनगर, वंटमुरी कॉलनी, विजयनगर, वड्डरवाडी यासह इतर भागामध्ये रुग्ण आढळले आहेत.
जिल्हय़ामध्ये 12,122 सक्रिय रुग्ण सध्या जिल्हय़ामध्ये 12 हजार 122 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. रविवारी 100 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सक्रिय रुग्णांचा हा आकडा वाढत चालला आहे. मागील लाटेपेक्षाही यावेळी अधिक रुग्ण सध्या सक्रिय आहेत.