59 जण झाले बरे, 1,733 सक्रिय रुग्ण
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ात रविवारी कोरोनाचे 121 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 59 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. बैलहोंगल तालुक्मयात एका 43 वषीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
एकूण बाधितांची संख्या 76 हजार 152 हून अधिक झाली आहे तर आतापर्यंत 73 हजार 625 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1 हजार 733 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 794 वर पोहोचला आहे.
बेळगाव तालुक्मयातील 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. अद्याप 1 हजार 700 हून अधिक जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत 9 लाख 67 हजार 897 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 85 हजार 769 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.
रविवारी हंगरगा, बाळेकुंद्री बी.के., चंदगड, नंदिहळ्ळी, शिंदोळी, येळ्ळूर, राकसकोप, शाहूनगर, नेहरूनगर, भाग्यनगर, हनुमाननगर, हिंदवाडी, खासबाग, महाद्वार रोड, मंडोळी रोड, गांधीनगर, सोनार गल्ली-वडगाव, राणी चन्नम्मानगर, विजयनगर, शहापूर, वीरभद्रनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत चालला आहे. रुग्णसंख्याही कमी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे तसेच कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.