कोरोना सक्रिय रुग्णसंख्येत घट
बेळगाव : कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. रविवारी 65 नवे रुग्ण आढळून आले असून जिल्हय़ातील 158 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना वेगवेगळय़ा इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 77,537 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 75 हजार 605 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 1087 सक्रिय रुग्ण आहेत. मृतांचा सरकारी आकडा 845 इतका आहे. रविवारी बेळगाव तालुक्मयातील 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अद्याप 3,916 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. आतापर्यंत 10 लाख 24 हजार 563 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. त्यापैकी 9 लाख 38 हजार 785 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ब्लॅक फंगसचे रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. जाफरवाडी, चंदूर, अगसगे, हिंडलगा, कंग्राळी खुर्द, सुळेभावी, राणी चन्नम्मानगर, अनगोळ, अशोकनगर, गायत्रीनगर, मराठा कॉलनी-टिळकवाडी, हिंदवाडी, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, शहापूर, शाहूनगर, हनुमाननगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.