प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग उच्चतम पातळीवर असून गेल्या एक वर्षातील 15 सप्टेंबरचा 1117 इतक्या रूग्णसंख्येचा उच्चांक मोडून काढत गुरूवारी सकाळी आलेल्या अहवालात 1186 इतक्या रूग्णसंख्येची नोंद झाली. हा संसर्ग पाहता पुढील दोन आठवडय़ांचा काळ अतिशय कठीण असून प्रशासनाने बेड आणि औषधांच्या उपलब्धतेवर लक्ष केंद्रीत केले आहे. लॉकडाऊनला जिल्हा सामोरा जात असताना पहिल्या दिवशीच रेकॉर्डब्रेक रूग्णसंख्या आणि 22 मृत्यूंची नोंद झाली आहे. रोजची रूग्णसंख्या आणखी उच्चांकावर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी 610 रूग्णांनी कोरोनावर मात केली, हा दिलासा मिळाला.
पॉझिटिव्हीटी रेट 24.31; साताऱयात 247 रूग्ण
जिह्यात रूग्णवाढीचा पॉझिटिव्हीटी रेट पुन्हा वाढला असून गुरूवारी तो 24.31 वर पोहचला. जिह्यात एकूण 4870 जणांच्या तपासणीत 1184 एवढी उच्चांकी रूग्णवाढ झाली आहे. यात सातारा तालुक्यात 247 रूग्ण नोंद झाले असून सातारा शहर व परिसरात 147 रूग्ण आहेत. फलटण तालुक्यात 197, कराडला 164, खटावला 115, वाई 92, खंडाळा 80, कोरेगाव 56, माण 26, महाबळेश्वर 54, जावली 46, पाटण 23 अशी रूग्णवाढ झाली आहे. सातारा, फलटण, कराडमध्ये शहरी भागासह ग्रामीण भागात संसर्ग गतीने पसरू लागला आहे.
जिह्यात 22 बाधितांचा मृत्यू
रूग्णवाढ होऊ लागल्याने मृत्यूही वाढू लागले आहेत. दुसऱया लाटेत आतापर्यंत सर्वाधिक 22 मृत्यू गेल्या चोवीस तासात झाले. यात 9 मृत्यू सातारा तालुक्यातील आहेत. स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे आनेवाडी (ता. जावली) येथील 44 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 76 वर्षीय महिला, जरेवाडी (ता. सातारा) येथील 64 वर्षीय महिला व खासगी हॉस्पीटलमध्ये कामेरी (ता. सातारा) येथील 81 वर्षीय महिला, चिंचणेर (ता. सातारा) येथील 70 वर्षीय महिला, प्रतापगंज पेठ येथील 70 वर्षीय पुरुष, करंजे (ता. सातारा) येथील 84 वर्षीय पुरुष, गोंदवले (ता. माण) येथील 37 वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठ येथील 76 वर्षीय महिला, राजेवाडी (ता. खंडाळा) येथील 58 वर्षीय पुरुष, बावधन (ता. वाई) येथील 70 वर्षीय पुरुष, तारुख (ता. कराड) येथील 80 वर्षीय पुरुष, औंध (ता. खटाव) येथील 63 वर्षीय पुरुष, वडुज (ता. खटाव) येथील 37 वर्षीय पुरुष, हडपसर (जि. पुणे) येथील 60 वर्षीय महिला, येवडेवाडी, पुणे येथील 48 वर्षीय पुरुष, जुनखेड (ता. सातारा) येथील 65 वर्षीय पुरुष, कराड येथील 90 वर्षीय महिला, ओगलेवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, मांडवे (ता. सातारा) येथील 65 वर्षीय पुरुष, रविवारपेठ (ता. फलटण) येथील 53 वर्षीय पुरुष, शिरवळ (ता. खंडाळा) येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 22 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
गर्दी हटली, वर्दळ कायम
जिल्हय़ात लॉकडाऊन सुरू झाला. मात्र पहिल्या लॉकडाऊनपेक्षा हा वेगळा असून अत्यावश्यक सेवांमध्ये अनेक बाबींचा समावेश झाल्याने रस्त्यांवर वर्दळ पाहावयास मिळाली होती. यात बेफिकीरीने फिरणारांचाही समावेश आहे. पोलीस प्रशासनाने पहिल्या दिवशी काहीशी सैल भूमिका घेतली होती. मात्र कारवाईचे सत्र कायम होते. अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली लोकांचे फिरणे सुरूच असल्याचे दिसत होते.
610 नागरिकांना दिला डिस्चार्ज
संसर्ग वाढत असताना कोरोनामुक्तीनेही वेग घेतला आहे. गुरूवारी 610 जणांनी कोरोनावर मात केल्याचे दिलासादायक वृत्त आले. जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 610 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
बेडची माहिती ऑनलाईन मिळणार
जिल्हय़ात बेड मिळवण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने बेडची माहिती वेबसाईटवर देण्याची व्यवस्था केली आहे. जिह्यातील बेड उपलब्धता, एकूण बेडची संख्या Covid19satara.in या वेबसाईटवर पाहायवयास मिळणार आहे.